Potato Shortage In World Saam Tv
लाईफस्टाईल

Potato Shortage In World: जगभरात बटाट्यांची टंचाई, फ्रेंच फ्राईज, चिप्सवर संक्रांत

जगभरातील बटाट्यांच्या टंचाईने फ्रेंच फ्राईज, चिप्स संकटात सापडले आहेत.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Potato Shortage In World: औरंगाबाद: जगभरातील बटाट्यांच्या टंचाईने फ्रेंच फ्राईज, चिप्स संकटात सापडले आहेत. जगभर सध्या बटाट्यांचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे फ्रेंच फ्राईज हा बटाट्याच्या तुकड्यांचा कुरकुरीत खाद्यपदार्थ बनवणाऱ्या रेस्टॉरंटना फटका सहन करावा लागत आहे. बटाट्याच्या चिप्सवरही अनेक देशांमध्ये संक्रांत आली आहे (Potato Shortage In World Restaurants Stops Giving French Fries And Potato Chips To Costumers).

अर्थात ही टंचाई (Shortage) बटाटयांच्या उत्पादनातील कमतरतेमुळे निर्माण झालेली नाही. कोरोना (Corona) मुळे अनेक जहाज सध्या समुद्रातच अडकून पडली असल्याने बटाट्यांचा साठा या जहाजांमधून रेस्टॉरंटपर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळेच जगभरातील फ्रेंच फ्राईज (French Fries) च्या तसेच चिप्स (Chips) च्या शौकिनांचा हिरमोड होत आहे.

फ्रेंच फ्राईजसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक चेन रेस्टॉरंटनी सध्या फ्रेंच फ्राईज देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. जपान (Japan) मध्ये गेल्या महिन्यापासून फ्राईजवर संक्रात आली आहे. ग्राहकांना बटाटा (Potato) येईपर्यंत वाट पाहण्याची विनंती करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत बटाट्याच्या चिप्सना मोठीच मागणी असते. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये बटाट्यांचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर चिप्सचे उत्पादन बंद होईल असा इशारा चिप्स उत्पादकांनी दिला आहे.

यंदा दक्षिण आफ्रिकेत जोरदार पाऊस आहे, यामुळे बटाट्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आयात केलेला बटाटाही अडकून पडला आहे. केनियात प्रत्येक डीशसोबत बटाटा चिप्स खाण्याची नागरिकांना सवय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंटने चिप्स देणे बंद केले आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT