PM Kisan Yojana  Saam Tv
लाईफस्टाईल

PM Kisan Maandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, दरमाह मिळतील ३ हजार रुपये; कसा कराल अर्ज?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Kisan Maandhan Yojana Registration Process:

देशात नागरिकांसाठी अनेक नवीन योजना राबवल्या जातात. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे 'पीएम किसान मानधन योजना'. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान मानधन योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला काही पैसे मिळणार आहे. ही योजना 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी आहे. अर्जदाराच्या वयानुसार गुंतवणुकीची किंमत ठरवली जाते. पीएम किसान मानधन योजनेत तुम्ही 18 व्या वर्षी अर्ज करु शकता. 18 व्या वर्षी तुम्हाला 55 रुपये प्रत्येक महिना गुंतवावे लागेल. तसेच 40व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दर महिना 200 रुपये गुंतवणूक करावी लागेल.

या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिना तीन हजार रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक केंद्राला भेट द्यावी लागेल. तिथे तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. याशिवाय तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकता. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

असा कराल अर्ज

  • सर्वप्रथम तु्म्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना या वेबसाईटला भेट द्या

  • त्यानंतर होमपेजवर लॉगिन करा

  • अर्ज दाखल करण्यासाठी फोन नंबर टाकावा लागेल.

  • त्यानंतर आवश्यक माहिती भरा

  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाका.

  • त्यानंतर अर्ज सबमिट करा.

  • त्यानंतर या अर्जाची प्रिंट काढा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

SCROLL FOR NEXT