Travelling Tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Travel Tips: कमी खर्चात होईल, सुखकर प्रवास..!

अशाप्रकारे करता येईल प्रवासाचे नियोजन.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबंई : उन्हाळ्याची सुट्टी आणि फिरायला जाणे हे तर सगळ्यांचे ठरलेले असते. क्वचितच असा कोणी असेल, ज्याला वेगवेगळ्या ठिकाणचे सुंदर नजारे पाहायला आवडत नसतील. प्रवास करणे किंवा सहलीला जाणे ही काही लोकांची आवड असते. त्याच वेळ, बजेट (Budget) आणि खर्चामुळे काही लोक इच्छा असतानाही प्रवास (Travel) करणे टाळतात. पण, काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास कमी खर्चातही उत्तम प्रवासाचा आनंद लुटता येतो. (travelling Tips in marathi)

हे देखील पहा -

प्रवासाची आवड असलेले लोक अनेक ठिकाणी फिरून अनुभव गोळा करण्याबरोबरच प्रवासाचाही अनुभव घेतात. बहुतांश लोक आपल्‍या बजेटचे व्यवस्थित नियोजन करुन प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतात. तर आम्ही काही ट्रॅव्हल टिप्स शेअर करत आहोत, ज्याचे नियोजन करून तुमचा प्रवासाचा खर्च बऱ्याच अंशी कमी होईल.

अशाप्रकारे करा नियोजन

१. माहिती गोळा करा -

प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी, सर्वात आधी तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देणार आहात त्या ठिकाणाची माहिती (Information) घ्या. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राची किंवा इंटरनेटची मदत घेऊ शकता. प्रसिद्ध पर्यटन स्थळे, प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि तुम्ही ज्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत आहात त्या ठिकाणचे भाडे याबद्दल काही माहिती गोळा करा.

२. प्री - बुकिंग -

आपण ज्या ठिकाणाची निवड केली आहे तिथे पोहोचल्यानंतर हॉटेल शोधणे खूप कठीण आणि तोट्याचे असू शकतो. त्यामुळे ट्रीपच्या नियोजनासोबतच त्या ठिकाणची सर्व ऑनलाइन हॉटेल्स तपासा आणि तुमचे बजेट, ठिकाण आणि आराम यानुसार हॉटेलचे ऑनलाइन प्री - बुकींग करा.

३. खाद्यपदार्थ सोबत ठेवा -

प्रवासाला निघण्यापूर्वी काही खाद्यपदार्थ सोबत ठेवायला विसरू नका. आपल्या पॅकिंगमध्ये स्नॅक्स आणि पेये समाविष्ट करा. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला महागडे खाद्यपदार्थ खरेदी करावे लागणार नाहीत.

४. पॅकेज तपासा -

तुमचा प्रवास कमी खर्चिक आणि सोपा करण्यासाठी तुम्ही टूर आणि ट्रॅव्हल वेबसाइटची मदत घेऊ शकता. सध्याच्या युगात अनेक ट्रॅव्हल कंपन्या स्वस्त दरात टूर पॅकेज आणि गाइड उपलब्ध करून देतात. अशा परिस्थितीत, प्रवासाचा खर्च देखील वाचेल आणि नवीन ठिकाण शोधण्यात मदत देखील मिळेल. तसेच कोणत्याही फसवणूकीपासून सावधान रहा.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन करा आणि त्याचा आनंद लुटा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT