Weekend Travel Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Weekend Travel Tips : विकेंड ला फिरायचा प्लॅन करताय? मग थालिसेन शहराला नक्की भेट द्या!

उत्तराखंड हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Weekend Travel Tips : उत्तराखंड हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच उत्तराखंडला देवभूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. धार्मिकदृष्टीने पाहिले तर यमुनोत्री, गंगोत्री ,बद्रिनाथ आणि केदारनाथ या धार्मिक स्थळांना लोक आवर्जून भेट देतात.

येथील हिमालय, नदी, धबधबे आणि तलाव पाहिल्यानंतर लक्षात येते की, याठिकाणी निसर्गाची देणगी लाभलेली आहे. मसुरी,नैनीताल,औली आणि रानिखेट हे ठिकाण फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत परंतु काही लोकांना फिरण्याची आवड असते त्यांना नविन ठिकाणी एक्सप्लोर करण्याचा छंद असतो.

जर तुम्ही उत्तराखंड मध्ये काही नविन ठिकाणी फिरण्याचा विचार करत आहात तर तुम्ही थालिसेन या शहरातील पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.थालिसेन हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील गडवाल जिल्हा येथील एक कसबा आहे,जे समुद्रापासून 1690 मीटर उंचीवर आहे. विकेंडला शांतता मिळवण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे.

तेथे फिरण्यासाठी काही सुंदर जागा -

प्राचीन मंदिरानी भरपूर -

थालिसेनच्या आजूबाजूला भरपूर प्राचीन आहेत त्याचे हिंदु पौराणिक कथेत विशिष्ठ स्थान आहे त्यात बिंदेश्र्वर महादेव, हशेस्वर महादेव,ब्यासी नदी मंदिर,तारकुंड धाईजूली इत्यादी.

थालिसेन ब्लॉक फिल्ड -

थालिसेन येथील हा एक छोटा भाग आहे तिथे उत्तराखंडी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात आणि स्थानिक सरकारद्वारे सार्वजनिक कार्यक्रम या हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

मानुसिया हॉन्टेड प्लेस -

मानुसियाम पूर्वीपासून भुतानसाठी ओळखले जाते.या जागेवर आता सरकारी क्वाटर बनले आहेत तेथील लोकांना काही वेगळ्या हालचाली जाणवल्या आहेत तुम्ही तिथे एक्सप्लोर करायला जाऊ शकता.

लोकल मार्केट -

या मार्केट मध्ये सर्व काही मिळून जाईल.येथील मुख्य आकर्षण बागवरी,एथी ब्याशी, सैदर आहे.हे त्या गावचे मुख्य बाजार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

SCROLL FOR NEXT