लाईफस्टाईल

Pigon Virus: 'कबूतर' व्हायरस घेईल जीव? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

कबूतर व्हायरस नाव ऐकूनच या व्हायरसचा धक्का बसला असेल. हा कबूतर व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो असा दावा करण्यात आलाय.हा दावा गंभीर आहे. त्यामुळे कबूतर व्हायरस नक्की आहे तरी काय? कबूतर व्हायरसमुळे आपल्याला खरंच धोका आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

कबूतरांची विष्ठा आणि पंखांच्या संपर्कात आल्याने दमा आणि टीबीसारखे गंभीर आजार होतात. फुफ्फुसाला संसर्ग होतो. हे आजार वाढले तर जीवावरही बेतू शकतं. हा दावा आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या हाती काही रिसर्च लागले. त्यामध्येही असे धक्कादायक दावे करण्यात आलेयत. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबतची अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य आणि साम इन्व्हिस्टिगेशन

अनेक विकार कबूतराचे पंख आणि विष्ठेनं होतात.

कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसाला संसर्ग होतो.

हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज येते.

दम लागणे, डोकेदुखी, खोकला लागतो.

हे गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेकजण कबूतर घरात पाळतात. कबूतरांना दाणे खायला घालणारेही कबूतरांच्या जास्त संपर्कात येतात. त्यामुळे कबूतरांपासून धोका टाळण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी तेदेखील पाहुयात.

काय काळजी घ्यावी?

कबुतराची घाण काढताना मास्क लावा

जास्त प्रमाणात कबूतर असलेल्या ठिकाणी जाणं टाळा

कबूतरांना हात लावल्यास हात स्वच्छ धुवा

ही काळजी घेतली तर कबुतरांपासून होणारा धोका टळू शकतो.मात्र, आमच्या पडताळणीत कबूतरांमुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरलाय.त्यामुळे तुम्ही कबुतर प्रेमी असाल तर थोडी काळजी घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Benefits: आहारात दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: अजित पवार गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार

Maharashtra Assembly Elections Date Live Update: दोन फेजमध्ये निवडणुका होण्याची शक्यता - रामदास आठवले

Viral Video: अरेरे! 'रामलीला'मध्ये श्रीराम- रावणामधील युद्धाचा सीन करताना दोघांमध्ये खरोखरच मारामारी झाली, VIDEO व्हायरल

Vastu Tips for Stairs: घरातील पायऱ्यांखाली चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका; आर्थिक हानी होऊन दारिद्र घरात येईल

SCROLL FOR NEXT