Physical Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Physical Relationship : कामसूत्राच्या 'या' 4 टिप्स फॉलो करा, लैंगिक संबंध होईल अधिक मजेशीर !

सेक्स करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्ही दोघेही सेक्ससाठी पूर्णपणे तयार आहात.

कोमल दामुद्रे

Physical Relationship : हल्ली प्रेम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला आपले नाते अधिक घट्ट व्हावे असे वाटत असते. त्यासाठी त्यांना आपल्या नात्याच्या थोड पलिकडे जाऊन विचार करावा लागतो. आपल्या जोडीदाराला (Partner) खूश करण्यासाठी आपण नात्याच्या अनेक परिसीमा ओलांडतो त्यासाठी आपण त्यांना भेटवस्तू, आपला वेळ (Time) व आपले त्याच्यावर असणारे प्रेम ही व्यक्त करतो.

हल्ली प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग अनेक आहेत पण त्यातील महत्त्वपूर्ण व मुख्य भूमिका म्हणजे सेक्स करणे. जी प्रत्येक जोडप्यात महत्त्वाची भूमिका बजावतात व त्याचा हवा तसा आनंद देखील घेतात परंतु, काही वेळेस शरीर संबंध ठेवताना अनेकांना समाधान वाटत नाही. त्यासाठी कामसूत्रकडून शिकण्याचे काही सोपे मार्ग येथे आहेत जे तुमची शरीर संबंध ठेवताना तुमच्या दोघांसाठी सर्वोत्तम वेळ बनवू शकतात. (Latest Marathi News)

सेक्स करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्ही दोघेही सेक्ससाठी पूर्णपणे तयार आहात, तुम्ही तुमच्या पार्टनरवर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करू नये. तुम्ही तयार असाल तर दोघांनी एकमेकांना साथ द्यावी.

1. फोरप्ले आवश्यक आहे

तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की, सेक्स करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या पार्टनरला उत्तेजित करावे लागेल. जेणेकरून ते देखील तुम्हाला सेक्सचा आनंद घेण्यासाठी सपोर्ट करतात. फोरप्लेसाठी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारता, तिला प्रेमाने स्पर्श करा, तिच्या त्या सर्व भागांना स्पर्श करा, इथे ती अधिक उत्तेजित होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेलाने मसाजही करू शकता.

2. किस करणे महत्त्वाची भूमिका

जोडीदाराचे चुंबन घेणे खूप महत्वाचे आहे. कारण तुमच्या ओठांचा स्पर्श तुमच्यासोबत उत्साह निर्माण करतो. चुंबन नेहमी आरामात केले पाहिजे कारण चुंबन केल्याने पुरुष जोडीदार खूप लवकर उत्तेजित होतो आणि सेक्स करण्यासाठी घाई करतो, ज्यामुळे तो आपल्या जोडीदाराला संतुष्ट करू शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या संपूर्ण शरीराचे चुंबन घेऊ शकता, जेणेकरून तुमचा पार्टनर इरोजेनस झोनमध्ये जाईल आणि तुम्ही त्यांना सेक्सचा उत्तम आनंद देऊ शकाल.

3. महिलांना अनेक कामोत्तेजना भावना असतात

कामसूत्रानुसार सेक्स करताना महिलांना अनेक ऑर्गेज्म होऊ शकतात आणि ऑर्गेज्म मिळाल्यानंतरही संभोग करता येतो. पण जर पुरुष जोडीदाराला एकदा कामोत्तेजना मिळाली तर त्याची एनर्जी लेव्हल खाली जाते, त्यामुळे तो सेक्स करत नाही. त्यामुळे अशा स्थितीत पुरुष जोडीदाराने आधी त्याच्या जोडीदाराला ऑर्गेज्मपर्यंत पोहोचवणे आणि नंतर स्वत:चे ऑर्गेज्म मिळवणे आवश्यक आहे.

4. महिलांनीही सहकार्य करावे

महिलांनीही सेक्स करताना जोडीदाराला उत्तेजित केले पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही तुमचे नख आणि तुमचा प्रेमळ आवाजाचा वापर करु शकता. याशिवाय सेक्सचा अधिक आनंद घेण्यासाठी तुम्ही लाईट बंद किंवा कमी करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT