Leg Cramps Signs Google
लाईफस्टाईल

Leg Cramps Signs: पायात सतत गोळे येतात? दुर्लक्ष करू नका; या ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Diabetes Warning Signs: तुम्हाला सतत पायात गोळे येण्याच्या समस्या जाणवत असतील तर ही सामान्य नसून डायबेटीज, किडनीचे आजार, न्यूरोपॅथी आणि थायरॉईडसारख्या गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

थंडीच्या दिवसात वाताचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. पण उन्हाळ्यातही हात पाय दुखणं आणि पायात गोळे येणं ही समस्या जाणवत असेल तर सावध राहणं गरजेचं आहे. ही समस्या जर झोपेत किंवा जास्त वेळ उभं राहिल्यामुळे जाणवत असेल तर सावध व्हा. हे दुखणं जर थांबलच नाही किंवा सारखं या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

कोणत्या व्यक्तीला जास्त धोका

पायात गोळे येण्याची समस्याही वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि जास्त व्यायाम करणाऱ्यांना जाणवते. यामध्ये पायाच्या पोटऱ्यांमध्ये, मांडी किंवा पायांच्या तळव्यामध्ये जाणवते.

पायात गोळे येण्याची कारणे काय?

ज्या व्यक्तींच्या शरीरात पाण्याची कमतरता असते त्यांना ही समस्या सगळ्यात जास्त प्रमाणात जाणवते. पुरेसं पाणी न प्यायल्यामुळे शरीरातल्या इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे स्नायूंना गोळे येऊ शकतात. तसेच इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असलेल्यांना ही समस्या जाणवते. कारण पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांची कमतरता स्नायूंच्या कार्यावर परिणाम करत असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लोक जास्त व्यायाम करतात त्यांच्या स्नायुंवर ताण येतो आणि गोळे येतात.

धोक्याची लक्षणं कोणती?

पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD)

पेरिफेरल आर्टरी डिसीज या आजारामध्ये पायांपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात. त्यामुळे स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि चालताना किंवा काही हालचाल केल्याने गोळे येतात.

न्यूरोपॅथी

डायबेटीजमुळे मज्जातंतूंचं नुकसान होतं मुंग्या येतात, पायात सुन्नपणा जाणवतो आणि स्नायूंमध्ये गोळे येण्याची समस्या वाढायला लागते.

किडनीचे आजार

मूत्रपिंड जर व्यवस्थित कार्य करत नसेल तर शरीरातले द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडतं. त्यामुळे स्नायूंना तीव्र गोळे येऊ शकतात.

हायपोथायरॉईडीझम

थायरॉईड कमी असेल तर शरीरात सूज, स्नायू कमकुवत होतात आणि सतत गोळे येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

डायबेटीज

डायबेटीजमुळे शरीरातल्या साखरेचं संतुलन आणि हायड्रेशनवर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंच्या कार्यात अडथळे निर्माण होऊन गोळे येऊ शकतात. जर पायात सतत गोळे येत असतील किंवा स्ट्रेचिंग केल्यानंतरही आराम मिळत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टीप

ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही गंभीर लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परशुराम घाटा गॅबियन वॉलला तडे, दरड कोसळण्याची भीती

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT