Tomato Side Effects
Tomato Side Effects  Saam Tv
लाईफस्टाईल

Tomato Side Effects : स्टोन आणि डायरिया असलेल्यांनी चुकूनही खाऊ नका टोमॅटो, फायदासोबत होईल नुकसान!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tomato Harmful For Kidney Stone : टोमॅटोमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर यासारखे पोषक घटक असतात. टोमॅटो खाल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात खूप लोकांना टोमॅटो खायचे सवय असते. पण कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात करणे गरजेचे असते.

औषधी (Medicine) गुणधर्म असलेल्या फळा भाज्यांमध्ये टोमॅटोचा (Tomato) समावेश होतो.यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात असते आणि सोडियम, कोलेस्ट्रॉल, कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात.

टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते परंतु त्याचे काही होणारे तोटेही जाणून घेऊया आणि टोमॅटोचे सेवन कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेऊया.

टोमॅटो खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे -

डोळ्यांसाठी फायदेशीर -

डोळ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या व्हिटॅमिन सी टोमॅटोमध्ये आढळते त्यामुळे डोळ्याच्या समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो मदत करते. मिनरल्सच्या गुणधर्मामुळे टोमॅटोचे सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर -

आतडे निरोगी राहण्यासाठी फायबर गरजेचे असते.टोमॅटोमध्ये फायबरचे गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. सलाद मध्ये टोमॅटोचा समावेश करून टोमॅटो सूप, टोमॅटो ज्यूस पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता.

रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी -

टोमॅटोमध्ये अँटिऑक्साइड,लाइकोपिन,बीटा कॅरोटीन,व्हिटॅमिन सी असे घटक असतात जे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सर्दी आणि फ्लू संसर्ग पासून संरक्षण करण्यासाठी टोमॅटो काम करते. रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी टोमॅटोचा वापर तुम्ही करू शकता.

टोमॅटो खाण्याचे तोटे पुढील प्रमाणे -

आंबटपणा -

टोमॅटो मध्ये जास्त आम्लता असते.त्यामुळे टोमॅटो जास्त सेवन केल्याने ऍसिडिटी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.काही लोकांना टोमॅटो खाल्यानंतर छातीत जळजळ होण्याचा त्रास सुरू होतो.

किडनी स्टोनच्या समस्या -

एका संशोधनानुसार टोमॅटोचे जास्ती सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. तुम्हाला जर किडनीचा आजार असेल तर टोमॅटो खाणे टाळले पाहिजे. टोमॅटो मध्ये आढळणारे कॅल्शियम ऑक्सलेट किडनीसाठी हानिकारक असते यामुळे स्टोन होण्याची शक्यता असते.

जुलाबाची तक्रार -

लूज मोशन, डायरीच्या बाबतीत जास्त टोमॅटो घाल्याने त्रास आणखी वाढू शकतो टोमॅटोमध्ये साल मोनेला नावाचा बॅक्टेरिया आढळतो जे डायरिया वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे टोमॅटोचे अति सेवन करणे टाळले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT