PCOS Diet Saam Tv
लाईफस्टाईल

Smoothies To Control PCOS: PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी या स्मूदी करतील मदत; झटपट होणाऱ्या रेसिपी पाहा

PCOS Diet: PCOS मुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Healthy Smoothies For PCOS:

मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु आजकाल खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे मासिक पाळीत अनेक समस्या येतात. त्यामुळे आजारपण येते. कधी कधी मासिक पाळी येण्याच्या वेळा चुकतात किंवा येत नाही. याला PCOS म्हणतात.

PCOS मुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आजकाल हा आजार खूप जास्त प्रमाणात होताना दिसतो. असंतुलित हार्मोन्समुळे हा आजार होतात. त्यामुळे अंडाशयात सिस्ट तयार होते. चेहऱ्यावर मुरुमे येतात. वजन वाढते. त्यामुळे या आजारावार वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. PCOS आजार असल्यास सकस आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही हेल्दी स्मूदी सांगणार आहोत. ज्यामुळे हा आजार नियंत्रणात राहील.

1. अ‍ॅवाकॅडो अननस स्मूदी (Avocado Pineapple)

तुम्ही घरच्या घरी अ‍ॅवाकॅडो अननस स्मूदी स्मूदी बनवू शकता. ही चविष्ट आणि पौष्टिकही असते.

सामग्री

1/4 कप अ‍ॅवाकॅडो, अर्धा कप- अननस, अर्धा कप- केळी, एक कप- दही, एक कप पालक

कृती

  • सर्वप्रथम पालक धुवून घ्या. त्यात अननस आणिअ‍ॅवाकॅडो घाला. ते बारिक करुन घ्या.

  • त्यानंतर त्यात एक कप पाणी आणि दही घालून मिक्सरमध्ये बारीक करा.

  • त्यानंतर स्मूदी कपमध्ये काढून पिऊ शकता.

2. केळी आणि खजूर स्मूदी

साहित्य

१-२ केळी, अर्धा वाटी- बिया नसलेले खजूर, चिमुटभर दालचिनी पावडर. अर्धा चमचा पीनट बटर, एक वाटी- दूध

कृती

  • सर्वप्रथम केळीची साल काढून मिक्समध्ये टाका.

  • त्यात खजूर आणि पीनट बटर मिक्स करा.

  • दूध घाला. त्यानंतर तुमची स्मूदी तयार आहे.

  • जर तुम्हाला स्मूदी पार घट्ट वाटली तर त्यात थोडे पाणी घाला.

3. बीटरूट आणि ब्लूबेरी स्मूदी

बीटरुट आणि ब्लूबेरी हे दोन्ही तुमच्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात.

साहित्य

1/4 बीटरूट, 1 कप ब्लू बेरी, अर्धी केळी, एक दोन चमचे ड्रायफ्रुट्स, 1 कप दही

कृती

  • सर्वप्रथम बीटरूट धुवून कापून ते मिक्समध्ये बारीक करा.

  • त्यानंतर ब्लू बेरी , केळी आणि दही एकत्रितपणे मिक्सरमध्ये बारीक करा.

  • त्यानंतर त्यावर बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स टाकून स्मूदी प्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

दर्शनासाठी तासनतास रांग.., भुकेलेल्या साई भक्तांवर उपासमारीची वेळ; गॅस टंचाईमुळे प्रसादालयातून डाळ-भात वगळला|VIDEO

Maharashtra Live News Update : धुळ्यात वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बसला गहू उत्पादक शेतकऱ्याला

मुख्यमंत्र्यांच्या हॅलीपॅड कॅम्पसमध्ये अचानक बैल घुसला; हवालदार जीव मुठीत घेऊन धावला, नेमकं काय घडलं?

गॅस सिलिंडर तुटवड्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? VIDEO

SCROLL FOR NEXT