Parenting Tips Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : 'या' गोष्टींमुळे पालक आणि मुलांमध्ये वाढतो दुरावा; वेळीच सावध व्हा

Parenting Tips : पालक स्वत: नकळत अशा काही चुका करतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. त्यामुळे आज मुलं आणि पालक यांमध्ये दरी निर्माण होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

साम टिव्ही ब्युरो

प्रत्येक व्यक्तीला आपलं मुलं संपूर्ण जगात खास आणि महत्वाचं वाटतं. मुलांच्या संगोपणासाठी आई वडील सर्व प्रकारचे कष्ट घेतात. मात्र मुलं जसजशी मोठी होतात, शाळेत जातात तसतसे त्यांची मनस्थिती समजून घेणे काही पालकांसाठी कठीण ठरते. पालक स्वत: नकळत अशा काही चुका करतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. त्यामुळे आज मुलं आणि पालक यांमध्ये दरी निर्माण होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

सतत मुलांच्या चुका काढणे

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही चुका करतात. तसेत लहान मुलं सुद्धा प्रत्येक नवीन गोष्ट शिकत असताना बऱ्याच चुका करतात. तुलांनी केलेल्या चुकांवर सतत ओरडल्यास त्यांच्या मनात राग निर्माण होतो. केलेली चूक पुन्हा होणार नाही यासाठी मुलांना समजावून सांगणे गरजेचे असते. मुलांनी ती चूक पुन्हा करू नये यासाठी काम केले पाहिजे.

मुलांना वेळ न देणे

काही पालक दिवसभर कामामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे रात्री घरी आल्यावर प्रत्येकाने आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. मात्र काही पालक मुलांना वेळ देण्याऐवजी घरी आल्यानंतर देखील फोनवर गेम्स खेळत बसतात किंवा सोशल मिडिया स्क्रोल करतात. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये दुरावा वाढतो.

शाळेतील टेन्शन

शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अभ्यासाचं टेन्शन असतं. अभ्यासात काही गोष्टी चुकल्यास शिक्षक ओरडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ही गोष्ट सलत राहते. शाळेतील गोष्टी घरी आल्यावर सुद्धा त्यांच्या लक्षात राहतात. या काळात जर पालकांनी विद्यार्थ्यांना ओरडलं तर त्यांची मनस्थिती आणखी खचते. त्यामुळे मुलांना शाळेतून घरी आल्यावर शाळेत काय झाले? काय शिकवले या गोष्टी विचारल्या पाहिजेत.

टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम

बऱ्याचदा लहान मुलं फोनमध्ये विविध गेम्स खेळत असतात. गेम्सच्या नादात मुलांना स्वत:ला लागलेली भूक किंवा तहान सुद्धा समजत नाही. आपल्या खेळात ते अतिशय गुंग होतात. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणा होतो. त्यामुळे पालकांनी अशावेळी आपल्या मुलांची मानसिकता मसजून घेऊन त्यांच्याशी वागले पाहिजे. मुलं हट्टीपणा करत असतील तर त्यांना ओरडण्याऐवजी समजावून सांगितलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT