Parenting Tips Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजेत; न विचारल्यास पालक म्हणून फेल ठराल

Questions to Ask Your Child : लहान मुलांना शाळेतून घरी आल्याबरोबर काही महत्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही तुमच्या मुलांना हे प्रश्न विचारत नसाल तर तुम्ही खुप मोठी चूक करत आहात.

Ruchika Jadhav

प्रत्येक पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात. मुलं शाळेत गेली की ती पुन्हा घरी येईपर्यंत पालकांना त्यांची काळजी असते. काळजीपोटी प्रत्येक पालक आपल्या लहान मुलांना छान सांभाळतात, त्यांचं पालनपोषण करतात. तसेच त्यांची आवड-नावड समजून घेतात.

बरेच पालक लहान मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्यासाठी मस्त जेवण बनवतात. चांगले पदार्थ त्यांना खाऊ घालतात आणि झोपण्यास सांगतात. मात्र फक्त एवढ्या गोष्टी केल्या म्हणजे तुम्ही उत्तम पालक झालात असं होत नाही. त्यासाठी लहान मुलांना शाळेतून घरी आल्याबरोबर काही महत्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही तुमच्या मुलांना हे प्रश्न विचारत नसाल तर तुम्ही खुप मोठी चूक करत आहात.

जेवणाच्या डब्ब्यावर प्रश्न

मुल घरी आल्यावर त्याला आधी विचारा की, आजचा डब्बा कसा होत. तुला हे पदार्थ आवडले का? तुझ्या मित्रांनी आज काय आणलं होतं. असे काही साधे प्रश्न विचारून मुलाची आवड, तसेच त्याचे मित्र डब्ब्याला काय आणतात याबद्दल तुम्हाला समजेल.

मित्रांबाबत प्रश्न

शाळेतील मुलं जास्तवेळ मित्रांसोबत राहतात. त्यामुळे त्यांचे मित्र कोण आहेत? ते कुठे राहतात? त्यांचे आई वडील काय काम करतात? या सगळ्यांची माहिती तुमच्याकडे असायला हवी. कारण लहान मुलं वाईट गोष्टी लगेचच शिकतात. त्यामुळे त्यांचे मित्र चांगले असणे गरजेचं आहे.

शाळेतील चांगला क्षण विचारा

लहान मुलांना छान वाटावं यासाठी शाळांमध्ये देखील त्यांनी केलेल्या कामाचं, अभ्यासाचं कौतुक केलं जातं. असं कौतुक केल्याने मुलं फार आनंदी होतात. आपल्याबरोबर घडलेल्या गोष्टी त्यांना आपल्या पालकांना शेअर कराव्या वाटतात. त्यामुळे मुलांना घरी आल्यावर आज शाळेत काय झालं? हे नक्की विचारलं पाहिजे.

अभ्यास

आज काय अभ्यास दिला आहे. हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. लहान मुलं खेळण्याच्या गडबडीत आपला अभ्यास काय होता ते विसरून जातात. त्यामुळे घरी आल्यावर त्यांना अभ्यास काय आहे ते विचारा. त्यानुसार तुम्हाला त्यांच्याकडून अभ्यास पूर्ण करून घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT