Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : डिअर, मॉम-डॅड या सवयींमुळे मुलं होतात हट्टी, तुम्हीही करता का ही चूक?

Parents Child Bond : मुलांनी हट्टीपणा केला की, पालक देखील त्यांचा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करतात. वाढत्या वयानुसार त्यांचा हट्टीपणा अधिक वाढत जातो. पालकतत्व स्विकारताना अनेक जबाबदाऱ्या येतात. ज्या कधी कधी पूर्ण करणे कठीण होते.

कोमल दामुद्रे

Child Care Tips :

मुलांनी हट्टीपणा केला की, पालक देखील त्यांचा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करतात. वाढत्या वयानुसार त्यांचा हट्टीपणा अधिक वाढत जातो. पालकतत्व स्विकारताना अनेक जबाबदाऱ्या येतात. ज्या कधी कधी पूर्ण करणे कठीण होते.

बरेचदा पालकांना मुलांचे सगळेच हट्ट पुरवता येत नाही. अशावेळी ते टोकाच पाऊल उचलतात. मुलांचा चिडचिड स्वभाव, सतत रडणे यामुळे पालकांना वैताग येतो. त्यामुळे ते मुलांवर हात देखील उचलतात. मुलांना घराबाहेर नेल्यानंतरही एखाद्या वस्तू किंवा गोष्टीसाठी ते हट्टीपणा करु लागतात. अशावेळी मुलांशी कसे वागयचं? आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मुलं हट्टी होतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मुलांवर दबाव आणू नका

मुलांवर कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकू नका. त्यांच्या इच्छेविरुद्ध वागल्यास ते अधिक हट्टी होतात. मुलांवर दबाव टाकणे त्यांच्यावर हानिकारक ठरु शकते.

2. मुलांचे ऐका

मुलं (Kids) तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचे शांतपणे ऐका. जर तुम्ही मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने मुलं हट्टी होतात. मुलांना त्यांच्यावर वयानुसार समजावून सांगा

3. तुलना नको

प्रत्येक मुलांमध्ये स्वत:चे वेगळे गुण असतात. बऱ्याचदा पालकांना (Parents) त्यांच्या मुलांची इतरांशी तुलना करण्याची सवय (Habits) असते. त्यामुळे मुले त्या कृतीतून अधिक हट्टी होऊ लागतात.

4. भावनांना महत्त्व द्या

मुलांच्या भावनांना किंवा विचारांना महत्त्व दिले जात नाही तेव्हा ते अधिक हट्टी होतात. अशावेळी मुलांचे ऐकून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT