कोमल दामुद्रे
लग्नाचे विधी पार पडल्यानंतर नवरी मुलीला अनेक धार्मिक कार्यात उखाणे घ्यावे लागतात.
यावेळी नेमके कोणते आणि कसे उखाणे घ्यायला पाहिजे हे पाहूया.
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजण,.... रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,... रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,... रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,... रावांचे नांव घेते, सारे जण बसा
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,... रावांच्या नावाने घालते मंगळसुत्रांचा हार