Parenting Tips  Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips: पालकांनो, मुलांना अभ्यास करायला आवडत नाही? कसे कळेल?

Child Weak In Study : मुलं मोठी झाली की अभ्यासात लक्ष देत नाहीत तेव्हा समस्या निर्माण होतात.

कोमल दामुद्रे

Child Study Tips :

वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलांना सतत फोन किंवा टीव्ही हातात हवा असतो. खाताना किंवा अभ्यास करताना मुलांना फोनचे वेड लागलेले असते. बाळ जन्माला आले की, खाण्यापिण्यासाठी किरकिर करु लागते त्यामुळे आई त्याच्या हातात सरार्स देते हो फोन.

चिमुकल्या वयात आईच्या लळा लागण्याऐवजी बाळाला मोबाइल फोनचा जास्त लळा लागतो. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर त्यांना अनेकदा अभ्यासावर लक्ष व्यवस्थित रित्या केंद्रित करता येत नाही. काही मुलांना अभ्यास आवडतो. मुलं मोठी झाली की अभ्यासात लक्ष देत नाहीत तेव्हा समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत पालकांनी लहानपणापासूनच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या अभ्यासात आणि वागण्यावरही दिसून येतो, त्यामुळे ते अभ्यासात कमकुवत होतात. चला तर मग जाणून घेऊया अभ्यासात मुलं ढ का असतात.

1. अभ्यासात ढ असणाऱ्या मुलांच्या सवयी

  • अभ्यासात ढ असलेली मुले अनेकदा शाळेत (School) जाण्यास टाळाटाळ करतात, तसेच शाळेत न जाण्यास अनेक कारणे देखील देतात

  • अभ्यास (Study) करताना आधी खेळू देत मग अभ्यास करेन अशा अनेक बहाणे देतात.

  • बहुतेक वेळा, अभ्यासात कमकुवत मुले वर्गाच्या मागच्या बाजूला बसतात आणि मॅडम किंवा सरांनी त्यांच्याकडे बघू नये किंवा त्यांना काहीही विचारू नये यासाठी ते प्रयत्न करतात.

  • मुलांना एकट्याने अभ्यास करायचा असतो किंवा पालकांचे आपल्याकडे लक्ष जाऊन नये यासाठी ते प्रयत्न देखील करतात. अशा परिस्थितीत ते अभ्यास करतात की दुसरे काही करतात हे ठरवता येत नाही, तर त्याचा अभ्यास आणि आयुष्य दोन्हीवर परिणाम होतो.

  • स्पर्धेच्या या युगात आपल्या मुलांने देखील पुढे जावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी ते त्यांच्यावर दबाव आणतात, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे न झाल्यास मुले मागे पडू लागतात.

  • परीक्षा जवळ आल्या की, मुले अभ्यासाचे टेन्शन घेतात त्यामुळे ते आजारी देखील पडतात. अशावेळी पालकांनी (Parenting) काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT