Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांना सतत टि.व्ही - मोबाईल फोन लागतो? वैतागले आहात ? 'या' टिप्स फॉलो करा

लहान मुलांना मोबाईलचे वैशिष्टय इतके चांगले माहीत असते की मोठेही त्यांच्या समोर हार मानतात.

कोमल दामुद्रे

Parenting Tips : मोबाईल फोनचे शिकार आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृध्दापर्यंत सगळेच झाले आहे. आजकाल लहान मुलांच्या हातातही स्मार्टफोन दिसू लागले आहेत. लहान मुलांना मोबाईलचे वैशिष्टय इतके चांगले माहीत असते की मोठेही त्यांच्या समोर हार मानतात.

फोनमध्ये यूट्यूब आणि गेम्स कुठे आहेत, ते कसे वापरायचे, हे सर्व मुलं काही मिनिटांत शिकतात. याशिवाय टीव्ही न पाहता जेवण न करण्याची सवय जवळपास प्रत्येक मुलामध्ये दिसून येते. मात्र, टीव्ही पाहण्याच्या ओघात तो नीट खात-पित नाही. दुसरीकडे, चुकून ते रिमोट कंट्रोलवर पडले आणि त्यांचे आवडते कार्टून चॅनेल बदलले तर,त्यामुळे मुलांचे रडणे ही घरोघरी गोष्ट बनली आहे.

विभक्त कुटुंबात, पालकांना मुलावर सतत लक्ष ठेवता येत नाही, म्हणून ते मोबाईल हातात देतात किंवा टीव्ही चालू करतात. मुलं टीव्ही आणि मोबाईलमध्ये व्यस्त होऊ शकतात पण मोबाईल आणि टीव्हीचा अधिक वापर केल्याने ते व्यसनी किंवा व्यसनाधीन होतात. अशावेळी मुलांना मोबाईल-टीव्हीपासून दूक ठेवणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या मुलालाही टीव्ही आणि मोबाईल फोनची सवय लागली असेल, तर काही पद्धतींचा अवलंब करून पालक मुलांच्या सवयीपासून मुक्त होऊ शकतात.

मुलांमधील मोबाईल-टीव्हीची सवय दूर करण्यासाठी टिप्स

1. मुलांना वेळ द्या

मोकळा वेळ (Time) घालवण्यासाठी मुलं मोबाईल आणि टीव्ही बघायला लागतात आणि जास्त वेळ घालवल्यामुळे त्यांना व्यसन जडतं. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. जेव्हा मूल पालकांसोबत व्यस्त असते, तेव्हा तो टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर जाऊ लागतो. यामुळे त्याच्या मेंदूचाही चांगला विकास होईल.

2. तुमच्या मुलाला नवीन गोष्टी शिकवा

मुलाला टीव्ही किंवा मोबाईलच्या वापरापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांचा छंद किंवा आवड समजून घ्या आणि त्याकडे प्रोत्साहन द्या. गाणे, नृत्य, चित्रकला किंवा धार्मिक कार्यात मुलांना सहभागी करून घ्या. मुलांचा वेळ अशा कामांमध्ये जातो तेव्हा मोकळ्या वेळेत टीव्ही आणि मोबाईल वापरण्याऐवजी ते त्यांच्या आवडीच्या कामांना वेळ देतात.

3. वेळ सेट करा

मुले सतत टीव्ही किंवा मोबाईल (Mobile) पाहात असतील तर ते दूर करण्यासाठी, टीव्ही पाहण्याची किंवा मोबाइल वापरण्याची वेळ निश्चित करा. या बाजूला त्यांचा वेळ हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून एका झटक्यात मोबाईल काढून घेतल्याने सवय सुटणार नाही.

4. स्वतःला बदला

मुलांच्या वागण्याचा परिणाम त्यांच्या पालकांवर होत असतो. जर पालक मुलांसमोर मोबाईल किंवा टीव्हीमध्ये जास्त वेळ घालवत असतील तर मूलही तेच करतील. त्यामुळे मुलांसमोर चांगले उदाहरण ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT