Orange Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Orange Benefits : हिवाळ्यात संत्री खाण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

हिवाळ्यात संत्रीही सहज उपलब्ध होते. याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

कोमल दामुद्रे

Orange Benefits : अशी अनेक मोसमी फळे हिवाळ्यात उपलब्ध असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात संत्रीही सहज उपलब्ध होते. याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन-सी, आयोडीन, सोडियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे आढळतात, जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात आणि आजारांपासून बचाव करतात.

हिवाळ्यात संत्री नियमित खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. पचनशक्ती मजबूत करण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत होते. चला तर मग जाणून घेऊया, संत्री खाण्याचे काय फायदे आहेत.

1. कमी कोलेस्ट्रॉल

संत्र्यामध्ये असलेले पेक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे एक विरघळणारे फायबर आहे, जे शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.

2. हृदयासाठी फायदेशीर

पोटॅशियम, फोलेट आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म संत्र्यामध्ये आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही संत्र्याचे नियमित सेवन करू शकता.

3. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

संत्र्यामध्ये असलेले मॅग्नेशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची तक्रार आहे ते संत्र्याला आहाराचा भाग बनवू शकतात.

Orange Benefits

4. वजन कमी करण्यात फायदेशीर

संत्र्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. फायबर युक्त गोष्टी खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते.

5. डोळ्यांसाठी उपयुक्त

संत्र्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन (Vitamins)-सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात, जे डोळे (Eye) निरोगी ठेवण्यास मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhwar Peth : बुधावर पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्यांचा पाठलाग करायचं अन् लुटायचे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Home Made Upvasfood: श्रावण आला की उपवास आलाच! हे पदार्थ आधीच बनवा आणि ठेवा स्टोअर करून

Shocking News : मैत्रिणीनेच रचला कट, १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: फक्त १ मिनिटं उशीर झाल्याने परीक्षेचा बसून दिले नाही, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Gold Price :सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

SCROLL FOR NEXT