सध्या सगळीकडे चॅट जीपीटीची चर्चा सुरु आहे. ChatGPT हे OpenAI द्वारे विकसित केलेले एक भाषा निर्मिती मॉडेल आहे. ज्यामुळे आपली महत्त्वाची कामे किंवा त्या संबंधित माहिती आपल्याला सहज मिळू शकते.
जर तुम्ही देखील OpenAI चा ChatGPT चॅटबॉट वापरत असाल , तर हे नवीन अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ChatGPT आता फोनवर अॅप म्हणून वापरता येणार आहे. कंपनीने आपल्या Android वापरकर्त्यांसाठी ChatGPT चे अधिकृत अॅप लाँच केले आहे.
कंपनीने ट्विटरद्वारे अॅप लॉन्च करण्यासंदर्भात माहिती पोस्ट केली आहे. कंपनीने यूएस, बांगलादेश, ब्राझील आणि भारतात (India) राहणाऱ्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अॅप (App) लाँच केले आहे.
आयओएस वापरकर्त्यांसाठी ChatGPT चे अधिकृत अॅप मे महिन्यातच लाँच करण्यात आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत, जे वापरकर्ते अँड्रॉइड फोन वापरत होते, त्यांच्यासाठी चॅटजीपीटी केवळ वेब आवृत्तीसह उपस्थित होते. त्यासाठी कंपनीने वापरकर्त्यांसाठी घोषणा केली होती की Android वापरकर्त्यांसाठी अधिकृत अॅप देखील लवकरच लॉन्च केले जाईल. अशातच कंपनीने Android वापरकर्त्यांसाठी ChatGPT चे अधिकृत अॅप लाँच केले आहे.
1. Android फोन मध्ये ChatGPT अॅप कसे डाउनलोड करावे?
ChatGPT चे अधिकृत अॅप कंपनीने दिलेल्या अधिकृत लिंकवरून डाउनलोड केले जाऊ शकते. याशिवाय चॅटजीपीटी प्ले स्टोअरवरूनही डाउनलोड करता येईल.
सर्वप्रथम, Android फोनवरून प्ले स्टोअरला भेट द्यावी लागेल.
प्लेस्टोअरवर ChatGPT अॅप टाइप करावे लागेल.
chatgpt टाइप करण्यासोबतच अॅपवर मोबाईल नंबर टाइप करावा लागेल
कंपनीचे अधिकृत अॅप निळ्या बॅकग्राउंडमध्ये दिसेल. OpenaAI ChatGPT अॅपच्या खाली दिसेल.
अॅपवर क्लिक करण्यासोबतच तुम्हाला Install या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
हे पूर्ण केल्यावर, अॅप डाउनलोड केले जाईल आणि तुमच्या Android फोनवर वापरासाठी उपलब्ध होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.