OnePlus Open  Saam Tv
लाईफस्टाईल

OnePlus Open Launch : OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन लॉन्च; जाणून घ्या मोबाईलची किमत अन् फिचर्स

Bharat Jadhav

OnePlus Open Launch :

वनप्लसने आपला पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open मुंबईत लॉन्च केला. हे फोन फक्त दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असणार आहेत. Emerald Green आणि Voyager Black या रंगात हा मोबाईल तुमची शान वाढवणार आहे. वनप्लस कंपनीने आपल्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त OnePlus Open फोल्डेबल फोन लॉन्च केला.(Latest News)

वनप्लस ओपन फोल्डेबल फोनचे वजन फक्त २३८ ग्रॅम आहे, त्यामुळे हा फोन सहज सहजपणे कॅरी करता येईल. या फोनची बॉडी स्टेनलेस स्टील, टायटॅनियम फ्रेम आणि कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OnePlus Open फोल्डेबल फोनमध्ये प्लॅगशिप इमेज क्लॉलिट देण्यात आलीय. या फोनमध्ये थ्री पावरफूल सेंसर देण्यात आलाय. यात प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सेल सोनी एलवायटी - टी ८०८ Pixel Stacked सेंसर देण्यात आलाय. लो लाईट शुटिंगसाठी या मोबाईल फोनमध्ये ६४ मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा देण्यात आलाय. जो ३x झूम आणि ६x झूम सेटिंग देण्यात आलीय. तसेच या फोनमध्ये Ultra res Zoom सह एआय सपोर्ट सेंसरही देण्यात आलाय.

जर तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅप्चर करायचा असेल. किंवा तुम्हाला शुटिंग करायची आवड असेल हा फोन तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या मोबाईल फोनमध्ये तुम्ही ४ K ने व्हिडिओ शूट करू शकतात. OnePlus Open फोल्डेबल फोनचा डिस्प्ले फोल्ड केल्यानंतर ६.३१ इंच असतो, तर फोन उघडल्यानंतर त्याचा डिस्प्ले ७.८२ इंच होत असतो. याचा रिफ्रेश दर 120Hz, LTPO 3.0, 10 बिट कलर आहे. तसेच, फोनची पीक ब्राइटनेस 2800 nits आहे. व

नप्लस ओपन फोल्डेबल फोनमध्ये ऑक्सिजन ओएस देण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला मल्टी टास्किंग काम करता येणार आहे. तसेच, तुम्ही फोनमध्ये एकाच वेळी दोन टॅब उघडू शकता. त्याचबरोबर हा फोन गेमिंगच्या बाबतीतही चांगला आहे.

OnePlus Open काय आहेत स्पेसिफिकेशन

वनप्लसच्या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आलंय. जे १६ जीबी LPDDR5X रॅम आणि 512 जीबी UFS4.0 स्टोरेजची क्षमता मिळते. या फोनमध्ये ४८०८ mAh ची पावरफूल बॅटरी दिली जाते. हे ६७ च्या फास्ट चार्जरला सपोर्ट करत असते. कंपनीचा दावा आहे की हा फोन १ ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी फक्त ४२ मिनिटे लागतात. OnePlus Open 5G तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो.

OnePlus Open फोल्डेबल फोनची पहिली विक्री २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या फोनसह, तुम्हाला Google One वर ६ महिन्यांसाठी १००० जीबी जागा मिळेल. YouTube Premium चे ६ महिने सबस्क्रिप्शन मिळेत तसेच Microsoft ३६५ चे ३ महिने सबस्क्रिप्शन मिळेल. OnePlus च्या फोनची किमत १, ३९,९९ ९ रुपये ठेवण्यात आलीय. या मोबाईलची प्री-बुकिंग १९ ऑक्टोबरपासून म्हणजेच आज OnePlus च्या अधिकृत साइट आणि ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर सुरू झाली आहे.

OnePlus Open फोल्डेबल फोनच्या प्री-बुकिंगवर, तुम्हाला ८ हजार रुपयांचा ट्रेड बोनस आणि १२ महिन्यांचा विनाशुल्क EMI मिळत आहे. याचबरोबर तुम्ही ICICI बँक कार्ड किंवा इन्स्टंट बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट मिळेल. तर Jio Plus वापरकर्त्यांना १५ हजार रुपयांचे फायदे मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT