Panchang today horoscope SAAM TV
लाईफस्टाईल

Panchang Today: मंगळवारी मघा नक्षत्र व शोभन योग; आज कोणत्या राशींना मिळणार यश?

Magha Nakshatra Shobhana Yog: आज मंगळवार असून माघ नक्षत्र आणि शोभन योगाचा संगम झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. करिअर, आर्थिक लाभ आणि नातेसंबंधांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा. कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी, मघा नक्षत्र आणि शोभन योग यांचा प्रभाव आज दिवसभर जाणवणार आहे. चंद्र सिंह राशीत असल्यामुळे मान-सन्मान, अधिकार आणि जबाबदारी यांचा विचार अधिक ठळक होणार आहे. आजचं पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त कधी आहे आणि कोणत्या राशींसाठी हे लकी ठरणार आहे ते पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथी: कृष्ण द्वितीया

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • वार: मंगळवार

  • नक्षत्र: मघा

  • योग: शोभन

  • करण: तैतिल

  • चंद्र राशि: सिंह

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 07:06:46 AM

  • सूर्यास्त: 06:15:58 PM

  • चंद्रोदय: 07:48:49 PM

  • चंद्रास्त: 08:03:23 AM

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): फाल्गुन

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

12:19:00 PM ते 01:03:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 03:28:40 PM ते 04:52:19 PM

यमघंट काल: 09:54:04 AM ते 11:17:43 AM

गुलिकाल: 12:41:22 PM ते 02:05:01 PM

आज कोणत्या चार राशींना दिवस विशेष चांगला आहे?

सिंह रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना मान्यता मिळू शकते. प्रतिष्ठेशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

मेष रास

नवीन उपक्रम राबवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धाडसी निर्णय घेतल्यास यश मिळू शकते. कामात उत्साह आणि गती जाणवणार आहे.

धनु रास

आज भाग्याची साथ मिळू शकणार आहे. शिक्षण, प्रवास किंवा दीर्घकालीन योजनांबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा पाठिंबा लाभणार आहे.

तूळ रास

सामाजिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत होतील. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक बाबतीतही समाधानकारक स्थिती राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगावातील पहूरजवळील वाकोद शिवारात ५५ किलो गांजा जप्त

Gold Price: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, १० तोळा ९७०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

Wardha : आयकर अधिकारी असल्याचं सांगितलं, सर्च वॉरंट दाखवलं; वर्ध्यात प्राध्यपकाच्या घरात चोरट्यांची घुसखोरी

Iran - Israel War: दुबईत अडकलेल्यांच्या मदतीला धावणार सोनू सूद; म्हणाला तुम्ही कुठेही असाल, 'मला मॅसेज करा...'

SCROLL FOR NEXT