Omicron Varient: ओमीक्राॅनचा विस्तार समुह संसर्गाच्या पातळीवर! - Saam TV
लाईफस्टाईल

Omicron Varient: ओमीक्राॅनचा विस्तार समुह संसर्गाच्या पातळीवर!

ओमिक्राॅनच्या थैमानाबाबत आरोग्य मंत्रालयाची संस्था आयएनएसएसीओजीच्या (इंडियन सार्स कोव-२ जिनोमिक कन्सोर्शियम) ताज्या निष्कर्षांनी चिंता वाढविली आहे

साम टिव्ही

(अजय बुवा)

नवी दिल्ली : ओमिक्राॅनच्या थैमानाबाबत आरोग्य मंत्रालयाची संस्था आयएनएसएसीओजीच्या (इंडियन सार्स कोव-२ जिनोमिक कन्सोर्शियम) ताज्या निष्कर्षांनी चिंता वाढविली आहे. ओमिक्राॅन व्हेरिएन्टचा विस्तार आता कम्युनिटी स्प्रेड म्हणजेच समूह संसर्गाच्या पातळीवर पोहोचला आहे. एवढेच नव्हे तर ओमिक्राॅनचा नवा व्हेरिएन्ट बीए.२ ची काही प्रकरणे देखील देशात आढळून आला आहे. (Omicron Variant community spread threat)

कोरोना विषाणूचा जनुकीय संरचनेच्या विश्लेषणासाठी नेमलेल्या आयएनएसएसीओजीच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या या संस्थेने दावा केला आहे, की ओमिक्राॅन व्हेरिएन्टचा (Omicron Variant) सामुहिक संसर्ग सुरू झाला आहे, काही दिल्ली, मुंबई (Mumbai) सारख्या महानगरांमध्ये तर आधीच हा प्रकार झाला आहे म्हणूनच वेगाने ओमिक्रान बाधितांची संख्या वाढत आहे.

या शहरांमध्ये सामुहिक संसर्गामुळे (Community Spread) आणखी वेगाने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बाहेरून आलेल्यांमध्ये संसर्ग वाढत होता. आता अंतर्गत रुग्णांमुळे संक्रमण वाढण्याची चिन्हे आहेत. मध्ये आणखी एक चिंता वाढविणारी बाब म्हणजे ओमिकाॅनचा एक नवा व्हेरिएन्ट बीए.२ याची लागण झालेले रुग्णही देशात आढळून आले आहेत.

आतापर्यंत ओमिक्राॅन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणे नसणे किंवा सौम्य लक्षणे असल्याचे आढळले होते. आता नव्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे तसेच आयसीयुची आवश्यकता असलेल्यांचे प्रमाण वाढते आहे. या व्यतिरिक्त आणखी एक व्हेरिएन्ट बी.१.६४०.२ सापडला असून त्याचे अध्ययन सुरू आहे.

मात्र, त्याचा फैलाव झाल्याचे पुरावे अद्याप आढळलेले नाहीत. या संसर्गापासन बचाव करण्यासाठी सॅनिटायजर, मास्कचा वापर आणि कोविड नियमावलीचे कटाक्षाने पालन आवश्यक असल्याचे, असेही आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. देशात एका दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३.३३ लाखावर गेले असून सक्रीय रुग्णांची संख्या २२ लाख झाली आहे. तर, दिल्लीत मागील २४ तासात ९१९७ नवे रुग्ण आढळले असून ३४ जण दगावले आहेत. तर १३५१० जण बरे झाले आहेत. याकालावधीत संसर्गाचे प्रमाण १३.२२ टक्के असून दिल्लीतील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५४२४६ आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कराडमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT