Oil Free Diabetes Thali Saam TV
लाईफस्टाईल

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Diabetes Thali : तरुण वयातील मुला-मुलीं ना देखील मधुमेह असल्याचं समोर येत आहे. रक्तातील साखर फक्त गोड पदार्थ नाही तर अन्य तेलकट पदार्थ खाल्ल्याने देखील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

Ruchika Jadhav

राज्यात डायबिटीज रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही पेशंटमध्ये डायबिटीज अनुवंशीक असल्याचं पाहायला मिळतं. अगदी तरुण वयातील मुला-मुलीं ना देखील मधुमेह असल्याचं समोर येत आहे. फक्त गोड पदार्थ नाही तर अन्य तेलकट पदार्थ खाल्ल्याने देखील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळेच SAAOL चे संस्थापक आणि भारतातील प्रख्यात हार्ट डॉक्टर बिमल छाजेड यांनी एका ऑइल फ्री थाळीची माहिती दिली आहे.

@ saaolzerooilcooking या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करत त्यामध्ये डायबिटीज थाळीची रेसिपी देखील सांगण्यात आली आहे. त्यानुसार आपण सर्व पदार्थांची रेसिपी जाणून घेऊ.

ऑइल फ्री डाळ

सर्वात आधी एका कढईत थोडं जिरं घ्या. जिरं गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून भाजून घ्या. नंतर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून शिजलेली डाळ डाका. तयार झाली ऑइल फ्री डाळ. यावर तुम्ही वरून थोडी कोथिंबीरही टाकू शकता.

भाजी

डायबिटीज थाळीमधील भाजी बनवताना सुरुवातीला जिरे टाका, त्यावर थोडं पाणी टाकून लाल तिखट आणि हळद टाकून घ्या. नतंर धणेपूड आणि चविनुसार मीठ टाकल्यावर चिरलेली भाजी वाफवून घ्या.

तपाती

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मिक्स पिठांची पोळी खावी. नाचणी, ज्वारी, गहू, मेथी विविध मसाले टाकून कनीक मळा आणि त्याची चपाती लाटून भाजून घ्या. ही चपाती तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता.

SAAOL चा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आता तुमच्या घरी देखील मधुमेह असलेले रुग्ण असतील तर आजपासूनच ही थाळी बनवण्यास सुरुवात करा.

टीप : वरिल माहिकी सामान्य आहे. SAAOLची लिंक यात देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी SAAOL संस्थेशी तुम्ही बातचीत करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोच्या या 5 गोष्टी डोळे झाकून मान्य करणं ठरेल धोकादायक, चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

RCB vs GT IPL 2026 Final: सात षटकानंतर गुजरातच्या संघाचं अर्धशतक पूर्ण

विधानपरिषद निवडणुकीत मोठं काहीतरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना दिल्या महत्वाचा सूचना|VIDEO

Panvel Tourism : अवघ्या १० मिनिटांचा ट्रेक अन् दिसेल शहराचा सुरेख नजारा, पनवेलजवळील 'हे' ऑफबीट ठिकाण नक्की पाहा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT