असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी बऱ्याच भविष्यवाण्या केल्या आहेत. इतकंच नाही तर या भविष्यवाणी खरं झाल्याचं देखील पाहायला मिळलंय. असंच एक नाव म्हणजे नास्त्रेदमस. नास्त्रेदमस 2025 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. भूतकाळात त्यांनी केलेली भाकीतं सत्याच्या जवळ आहेत.
ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मते 2025 हे वर्ष खूप भीतीदायक असणार आहे. नवीन वर्षाच्या कोणत्या महिन्यात नास्त्रेदमसने जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होणार असल्याचं भाकित केलं आहे.
नास्त्रेदमस २०२५ मध्ये केलेल्या अंदाजानुसार, या वर्षी जुलै महिन्यात जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक असलेल्या जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक पुन्हा होणार आहे. जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक हा होत असतो. तोहोकू, कांटो आणि चुबू प्रदेशात नेहमीच ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. गेल्या 1300 वर्षांत याठिकाणी एकूण 130 मोठे स्फोट झाले आहेत. ज्यामध्ये पाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जपान आणि ऑस्ट्रेलियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाचा इतर देशांवरही परिणाम होणार असल्याचं भाकित त्यांनी केलं आहे. यामध्ये 2025 मध्ये हजारो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. असंही नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटलं आहे.
नॉस्ट्राडेमसने असंही सांगितलं आहे की अलीकडे हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्ड सारख्या ऑस्ट्रेलियन भागात अनेक स्फोट झालेत.
नॉस्ट्राडेमसने 16 व्या शतकात अशी अनेक भाकितं केली होती ज्या नंतर खऱ्या ठरल्या. जसं की ॲडॉल्फ हिटलरचा उदय, अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या, कोविड-19 महामारी, इस्रायल-हमास युद्ध, रशिया-युक्रेन युद्ध, 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या आणि राजीव गांधी यांची हत्या इत्यादी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.