Nokia G310  Saam Tv
लाईफस्टाईल

Nokia 5G Phone : आला रे आला., Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर

Nokia G310 Features : अनेक मोबाईल कंपन्यांनी 5G फोन लॉन्च केले आहेत. अशातच नोकियाने देखील 5G फोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव Nokia G310 आहे.

कोमल दामुद्रे

Nokia G310 Phone Price In India :

काही काळापूर्वी बाजारात नोकियाने भारतात अधिराज्य गाजवले होते. परंतु, मागच्या काही काळापासून नोकियाला उतरती कळा लागली. आता पुन्हा एकदा नोकियाने मार्केटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी तयारी केली आहे.

अनेक मोबाईल कंपन्यांनी 5G फोन लॉन्च केले आहेत. अशातच नोकियाने देखील 5G फोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव Nokia G310 आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून तो क्विकफिक्स तंत्रज्ञानासह येतो. डिस्प्ले, बॅटरी आणि चार्जिंग पोर्ट यासारखे घटक वापरकर्ते सहजपणे बदलू शकतात. चला जाणून घेऊया Nokia G310 ची किंमत आणि फीचर्स...

1. नोकिया G310 फीचर

Nokia G310 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोन Snapdragon 480+ SoC द्वारे समर्थित आहे आणि 4GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो.

2. नोकिया G310 कॅमेरा

Nokia G310 मध्ये ट्रिपल कॅमेरा (Camera) सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत. समोर 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

3. नोकिया G310 बॅटरी

Nokia G310 मध्ये 20W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोन OZO ऑडिओ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे ऑडिओ प्लेबॅक गुणवत्ता वाढवते. यात बायोमेट्रिक्ससाठी NFC चिप आणि फिंगरप्रिंट रीडर देखील आहे. फोनमध्ये (Phone) अँड्रॉइड 13 आधीच इन्स्टॉल आहे.

4. नोकिया G310 ची भारतात किंमत

Nokia G310 5G ची विक्री 24 ऑगस्टपासून सुरू होईल. हे T-Mobile वरून, T-Mobile द्वारे मेट्रो आणि ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते. त्याची सुरुवातीची किंमत (Price) 186 डॉलर (सुमारे 10 हजार रुपये) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT