McDonalds Burger News Saam Tv
लाईफस्टाईल

McDonald's Burger News : बर्गर होणार बेचव? मॅकडोनल्डने बर्गरमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय, हे आहे कारण

No Tomato In McDonald's Burger : देशात मान्सून सुरू झाल्यामुळे भाज्यांचे, विशेषतः टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

McDonald's Burger Decision : देशात मान्सून सुरू झाल्यामुळे भाज्यांचे, विशेषतः टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत. देशातील अनेक भागात टोमॅटोचा भाव 150 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसांवरच होत नाही, तर रेस्टॉरंटवरही होत आहे.

अशा परिस्थितीत मॅकडोनाल्ड्स या तुमच्या आवडत्या बर्गर आउटलेटने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे तुमच्या बर्गरची चवच बिघडली आहे. रेस्टॉरंटच्या बर्गरमधून आता टोमॅटो (Tomato) गायब झाले आहेत.

McDonalds Burger Decision

चांगल्या प्रतीचे टोमॅटो मिळत नाहीत

हवामानातील बदलामुळे आणि आमचे सर्व प्रयत्न करूनही आम्हाला चांगल्या प्रतीचे टोमॅटो मिळत नसल्याचे मॅकडोनाल्डने म्हटले आहे. म्हणूनच आमच्या काही आउटलेटमध्ये खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो नसतात. ही परिस्थिती कायमस्वरूपी नाही.

मॅकडोनाल्ड्सच्या भारतातील (India) (उत्तर आणि पूर्व) काही रेस्टॉरंट्सच्या मेनूमधून टोमॅटोची किंमत जास्त असल्याने ते गायब झाले आहे. हवामानातील बदलामुळे दर्जेदार टोमॅटो मिळत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

टोमॅटोचे भाव का वाढले?

प्रत्यक्षात काही काळापर्यंत शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाचा भावही मिळत नव्हता. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) स्वत:चे पीक नुकसानीमुळे उद्ध्वस्त केले होते. परिस्थिती अशी होती की, मे महिन्यात नाशिक, महाराष्ट्रात टोमॅटोचा भाव 1 रुपये किलोपर्यंत घसरला. मात्र आता त्याची किंमत अनेक पटींनी वाढली आहे.

यंदा देशात मान्सूनला विलंब झाला. मात्र नंतर अचानक पावसाने वेग घेतला. त्यामुळे त्याचा परिणाम पिकावर दिसून आला व अनेक ठिकाणी पीक उद्ध्वस्त झाले. पावसामुळे टोमॅटोचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या सर्व कारणांमुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. ही वाढ तात्पुरती असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT