सुरुवातीला वाटणारं मानेचं दुखणं २६ वर्षीय तरूणीसाठी मोठी आरोग्याची समस्या ठरलीये. या तरूणीला मानदुखीचा त्रास होत होता. या तरूणीला पहिल्यांदा ही साधी समस्या वाटली मात्र तपासणीनंतर तिला फॉलिक्युलर थायरॉइड नोड्यूल असल्याचं निदान झालं. या समस्येसाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं.
थायरॉईडच्या शस्त्रक्रियांमध्ये बहुतेक वेळा मानेच्या पुढील भागावर लांब किंवा स्पष्ट दिसणारा असा कायमस्वरूपी व्रण राहतो. वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर उभी असलेल्या या तरुणीसाठी मानेवर कायमचा व्रण राहण्याची कल्पनाच तिच्यासाठी अत्यंत चिंताजनक होती.
वॉकहार्ट हॉस्पिटल्समधील जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. अमोल वाघ यांनी सांगितलं की, “तिची भीती पूर्णपणे खरी होती. शस्त्रक्रियेचा विषय निघताच तिचा हात नकळत मानेकडे जात असे. हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नव्हता, तर आत्मविश्वास आणि सहजतेशी संबंधित विषय होता.
रुग्णाच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्थैर्याचाही विचार करून डॉक्टरांनी वाघ एक आधुनिक पर्याय सुचवला. यामध्ये बगलेतून (अॅक्सिला मार्गे) करण्यात येणारी एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमी द्वारे उपचार करण्यात आले. या पद्धतीत बगलेतून केवळ 5 मिमीचे तीन छोटे पोर्ट तयार करून संपूर्ण थायरॉइड शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामुळे मानेवर एकही छेद घ्यावा लागत नाही.
या मिनिमली इनवेसिव्ह (कमी आघात करणाऱ्या) तंत्रामुळे रक्तस्राव कमी झाला, जखमा लहान राहिल्या, बरे होण्याचा कालावधी कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानेवर कोणताही दिसणारा व्रण राहिला नाही. शस्त्रक्रियेनंतरचा सर्वात समाधानकारक क्षण तेव्हा आला, ज्यावेळी रुग्णीने आरशात पाहिलं आणि तिला तिची सर्वात मोठी अपेक्षा पूर्ण झालेली दिसली.
डॉ. वाघ म्हणतात, “थायरॉइडचा आजार बरा करणं हे आमचं प्रथम उद्दिष्ट होतं. मात्र तिला पूर्ण आत्मविश्वासाने पुन्हा तिच्या आयुष्यात परतण्यास मदत करणारा परिणाम देणंही तितकेच महत्त्वाचं होतं”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.