Heart Attack Risk google
लाईफस्टाईल

Heart Attack Risk: रात्री अचानक छातीत दुखतं, झोप येत नाही? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

Chest Pain Reasons: रात्री छातीत होणारे दुखणे दुर्लक्षित करू नका. हे अॅसिडिटी किंवा एंजायना असू शकते. डॉक्टरांच्या मते, वेळेवर उपचार न घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्याची जीवनशैली खूप बदलली आहे. अनेकांच्या कामाच्या जेवणाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. लोक दिवसभर कामानिमित्त घराबाहेर राहतात. महिन्यातून ४ ते ५ वेळा ते बाहेरचं खातात आणि उशीरा घरी जातात. त्यामुळे त्यांना रात्री अॅसिडीटीची समस्या जाणवते. त्याचवेळेस काहींना अचानक छातीत चमका मारायला सुरुवात होते. बऱ्याचदा अनेकांच्या रात्रीतच छातीत दुखायला लागतं. पण हा हार्ट अटॅकचा धोका असू शकतो. त्यामुळे तुम्ही जमेल तितकं यापासून सावध राहून उपचार केले पाहिजेत.

रात्री छातीत दुखण्याचं नेमकं कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या वारंवार छातीत दुखत असेल, तेही रात्रीच्या वेळेस तर यामागे अनेक कारण असू शकतात. बऱ्याचदा ही सामान्य वाटणारी लक्षणं तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात. पुढे आपण याबद्दल जाणून घेऊयात.

पहिले गंभीर कारण

डॉक्टरांच्या मते, एंजाइना हे यामागचं मुख्य कारण असू शकतं. जेव्हा तुमच्या ह्रदयापर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचत नाही, तेव्हा शरीरातल्या मांसपेशींनासुद्धा ऑक्सिजन मिळणं कमी होत जातं. त्यामुळे रात्रीच्या वेळेस तुमच्या छातीत दुखायला लागतं. याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

दुसरे कारण

डॉक्टरांच्या मते, तुम्हाला अॅसिड रिफ्लेक्समुळे तुमच्या छातीत दुखू शकतं. कारण जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा शरीरातलं अॅसिड वरच्या बाजूला येतं. त्याने जळजळ वाढते आणि तुमच्या छातीत चमका मारायला सुरुवात होते.

तिसरे महत्वाचे कारण

जर तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. अशावेळेस तुमची दुखणी वाढतात. कारण प्लुरीसी हा फुफ्फुसाच्या बाहेरच्या आवरणाला येणारी सूज असते. त्यामुळे तुम्हाला श्वास घेताना, झोपेत खोकताना छातीत दुखायला लागू शकतं. जर तुम्ही यावर वेळेवर उपचार आणि आहारात बदल केले नाहीत, तर तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याने तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT