High Blood Pressure Food: हेल्दी समजून खाताय? पण 'या' ५ पदार्थांमुळे नकळत वाढतोय तुमचा ब्लड प्रेशर; आजच व्हा सावध

Manasvi Choudhary

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब ही गंभीर समस्या आहे. शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत रक्तवाहिनींवर दाब आल्याने उद्भवते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयाचे आजार, मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

High Blood Pressure Food

उच्च रक्तदाब लक्षणे

उच्च रक्तदाबाची लक्षणे सहसा जाणवत नाही मात्र आरोग्यावर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतात यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे

High Blood Pressure Food

योग्य आहार

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आहार अत्यंत महत्वाचा आहे कारण काही पदार्थामुळे सोडियम, साखर, असते यामुळे आरोग्यावर नकळत परिणाम होतो.

High Blood Pressure Food

व्हेजिटेबल सूप आणि सॉस

दुकानातून आणलेले 'हेल्दी' व्हेजिटेबल सूप किंवा सॅलडवर टाकले जाणारे सॉसेस यामध्ये चव टिकवण्यासाठी आणि प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून मोठ्या प्रमाणात सोडियम वापरले जाते ज्यामुळे बीपी वाढण्याची शक्यता अधिक असते.

Use of sauce

फ्लेवर्ड ओट्स

वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा फ्लेवर्ड ओट्स खातो. मात्र, यात चव वाढवण्यासाठी साखर आणि मीठ या दोघांचे मिश्रण असते, जे रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करते.

oats

बेकरी पदार्थ

बेकीरीयुक्त पदार्थ ब्रेड, पेस्ट्री, मफिन्स, रोल्समध्ये साखर आणि ट्रान्स फॅट्स असतात ज्यामुळे देखील बीपी वाढण्याची शक्यता असते

Bakery products

फ्रोजन भाज्या

ताजेपणा टिकवण्यासाठी फ्रोजन भाज्यांमध्ये मिठाचा वापर केला जातो. जरी त्या हेल्दी वाटत असल्या तरी, त्यातील सोडियमचे प्रमाण साध्या भाज्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असू शकते.

Frogen Vegetables | GOOGLE

डाएट नमकीन किंवा मल्टीग्रेन बिस्किट्स

'लो फॅट' किंवा 'डाएट' टॅग असलेल्या नमकीन पदार्थांमध्ये चव आणण्यासाठी मीठ जास्त घातले जाते. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी बिघडते आणि बीपी वाढतो.

namkeen sev | yandex

next: Nashik Picnic Spots: नाशिकमध्ये फिरण्यासाठी 5 ठिकाणे सर्वात बेस्ट, एकदा गेलात की परत जावेसे वाटेल

येथे क्लिक करा...