Manasvi Choudhary
कडाक्याच्या उन्हाळ्यात नैसर्गिक थंड हवेच्या ठिकाणी वेळ घालवायला सर्वांनाच आवडते. जर तुम्हालाही उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लान करायचा असेल तर नाशिकमध्ये नक्की करा.
नाशिकमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत जेथे गेल्यानंतर तुम्हाला परत यावेसे वाटणार नाही असे तेथील वातावरण आहे.
नाशिकमध्ये १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. नाशिकपासून २८ किलोमीटर भगवान शंकराचं हे मंदिर आहे.
गोदावरी नदीच्या काठावर असलेले रामकुंड येथे आहे. प्रभू श्रीराम वनवासात असताना जेथे राहिले होते ते ठिकाण म्हणजे पंचवटी हे नाशिकमध्ये आहे.
या २००० वर्षे जुन्या बौद्ध लेणी आहेत. डोंगरावर वसलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मोठा ट्रेक करावा लागतो.
नाशिकला 'वाईन कॅपिटल ऑफ इंडिया' म्हटले जाते. येथे तुम्ही वाईन मेकिंग प्रक्रिया पाहू शकता आणि द्राक्षांच्या बागेत निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
अंजनेरी गड हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. ट्रेकर्ससाठी हे नाशिकमधील सर्वात आवडते ठिकाण आहे. येथील ढगांच्या कडा आणि निसर्ग भुरळ घालणारा आहे.