Manasvi Choudhary
घराच्या दाराला किंवा वाहनाला लिंबू मिरची लावलेलं तुम्ही देखील पाहिलं असेल, मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
घराच्या दाराला किंवा वाहनाला लिंबू मिरची लावण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. अनेकजण याकडे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणून पाहतात.
मात्र वाहनाला लिंबू- मिरची लावण्याचे नेमके कारण काय आहे यामागचे धार्मिक आणि वैणानिक कारणे कोणती ते पाहूया.
पूर्वी खेडेगावात अनेक सोयी- सुविधा नसायच्य त्याकाळी लोक बैलगाडीने प्रवास करायचे अशावेळी अनेक किटक आजूबाजूला असायचे अशावेळी स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचा वापर आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी करायचे.
लिंबू-मिरचीचा उपयोग किटकनाशक मारण्यासाठी करायचे कारण लिंबू मिरचीच्या वासामुळे डास आणि इतर कीटक दूर राहयचे.
लिंबू आणि मिरची हवेतील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते यामुळे घरामध्ये लिंबू- मिरची लावण्याची सुरूवात झाली.
नवीन वाहन खरेदी केल्यास कोणाचीही वाईट नजर लागू नये यासाठी नवीन वाहनाला लिंबू- मिरची लावली जाते.
प्रवास कोणताही अडथळा येऊ नये. अपघात होऊ नये यासाठी सुरक्षित प्रवासाठी लिंबू- मिरचीचा वापर केला जात असते.