Manasvi Choudhary
तांदळाचे पाणी केवळ त्वचेसाठी नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. अनेक महिला केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात.
तांदळाच्या पाण्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे अधिक असतात यामुळे तांदळाचे पाणी केसांच्या वाढीसाठी देखील फायदेशीर आहे.
तांदळाच्या पाण्यात 'इनोसिटॉल' नावाचे कार्बोहायड्रेट असते, जे खराब झालेल्या केसांची दुरुस्ती करते आणि त्यांना आतून मजबुती देतात.
तांदळाच्या पाण्यात असलेल्या अमिनो ॲसिड्समुळे केसांमधील गुंता कमी होतो आणि केसांना नैसर्गिकरित्या चमक येते.
तांदळाच्या पाण्यातील व्हिटॅमिन बी आणि ई केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केस गळणे थांबते आणि वाढ वेगाने होते.
केसांना मुलायम आणि चमकार होण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा हेअरस्पा तुम्ही करू शकता यामुळे केस मऊ होतील.
एका भांड्यामध्ये पाण्यात तांदूळ भिजत घाला आणि हे तांदूळ शिजवून त्यातील पाणी बाजूला काढा आणि केस धुतल्यानंतर पुन्हा तांदळाच्या पाण्याने केस धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.