Manasvi Choudhary
आजकाल महिला व पुरूष दोघांनाही वजन वाढण्याच्या समस्या उद्भवत आहेत. बदलेली लाईफस्टाईल, सतत बैठी काम, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा त्रास दिवसेदिवस वाढत चालला आहे.
वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता ज्यामुळे वजन लवकर कमी होईल.
तुळस ही केवळ धार्मिकरित्या नाही तर आयुर्वेदातही तुळशीच्या पानांचे अनेक उपयोग होतात. तुळशीच्या पानांचा रस करून प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तुळशीमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह याचे प्रमाण असते यामुळे तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही वजन कमी कऱण्यासाठी करू शकता.
तुळशीच्या पानांमधील पोषक घटक शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून चयापचय प्रक्रिया सुधारतात.
सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्यात ७-८ तुळशीची पाने टाकून ते रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी कोमट करून त्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध टाकून प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.