new year Saam Tv
लाईफस्टाईल

First New Year Celebration: सर्वात आधी कोणत्या देशात नवीन वर्ष होतो साजरा, भारत कितव्या स्थानी?

New Year 2025 Celebration: प्रशांत महासागरातील एका लहान देशात सर्वप्रथम नववर्ष सुरु झाले आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी ३.३१ च्या सुमारास तेथे न्यू इयर सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.

Saam Tv

New Year Celebration: नववर्षाच्या पूर्वसंध्येला नुकतेच काही तास शिल्लक आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. अनेकांनी थर्टी फस्टचा जय्यत प्लॅन केला आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जगभरात उत्साह पाहायला मिळत आहे. जगभरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळी नवीन वर्ष साजरे होते. यानुसार प्रशांत महासागरातील एका लहानशा देशात सर्वात आधी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन होणार आहे.

नवीन वर्षांचे सर्वात आधी स्वागत करणाऱ्या देशाचे नाव 'किरिबाटी' (ख्रिसमस आयलंड ऑफ रिपब्लिक किरिबाटी) असे आहे. भारतीय वेळेनुसार, ३१ डिसेंबरला दुपारी ३.३१ ला किरिबाटीमध्ये नवीन वर्षाचे स्वागत सुरु झाले आहे. किरिबाटीनंतर न्यूझीलंडच्या चॅथम बेटांवर न्यू इयर सेलिब्रेशनला सुरुवात झाली. त्यानंतर न्यूझीलंडमधील ऑकलंड आणि वेलिंगटन या प्रमुख शहरांमध्ये नववर्ष सुरु झाले. न्यूझीलंडमध्ये भारताच्या वेळेच्या तुलनेत ७ तासांपूर्वी २०२५ वर्ष सुरु झाले.

पृथ्वीच्या आकारामुळे प्रत्येक ठिकाणी वेळ ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी सूर्याद्य लवकर होतो, तर काही ठिकाणी सूर्यास्त लवकर होतो. या हिशोबाने काही देशांमध्ये नववर्ष सर्वप्रथम सुरु होते. यंदा किरिबाटी देशात सर्वात आधी २०२५ हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. भारताच्या तुलनेत सात तास आधी या छोट्या देशात नवनर्षाला सुरुवात झाली आहे.

भारतीय वेळेनुसार, रात्री ८.३० च्या आसपास जपान, दक्षिण आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये २०२५ वर्ष सुरु होईल. त्यानंतर चीन, फिलिपिन्स, सिंगापूरमध्ये न्यू इयर सेलिब्रेशनला सुरुवात होईल. बांगलादेश, नेपाळ यांच्यानंतर मग भारतात २०२५ वर्षाची सुरुवात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT