WhatsApp Saam Tv
लाईफस्टाईल

'व्हॉट्सअ‍ॅप'ने आणले नवे फीचर; एकाचवेळी १० डिव्हाईस चालवता येणार

तुम्ही जर प्रीमियम सेवा घेतली. तर १० डिव्‍हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकता.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवं नवे बदल करत असते.आता व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येक स्मार्टफोनवर वापरता येते. व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येकवेळी नवीन बदल करुन आपल्या वापरकर्त्यांना उत्तम सेवा देण्याचे काम करत असते. व्हॉट्सअ‍ॅप आतापर्यंत फ्रीमध्ये वापरता येत होते. पण आता व्हॉट्सअ‍ॅपने प्रिमीयम सेवा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने (Whatsapp) प्रीमियम सर्विस देण्याची घोषणा केली आहे. ही सेवा व्हॉट्सअ‍ॅपने व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या लोकांसाठी सुरु केली आहे. या सेवेसाठी आपल्याला मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना व्यावसायिक खात्यांमध्ये व्हॅनिटी युआरएल, पूर्वीपेक्षा अधिक लिंक केलेले डिव्हाइसेस सारखे अधिव सेवा मिळणार आहेत.

एकाचवेळी १० डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपने वापरु शकता

मेटाने अजुनही या सेवेचे अनावरण केलेले नाही. याची माहितीही शेअर केलेली नाही.पण एका अहवालात या फिचरची माहिती सांगण्यात आली आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनेक खास फीचर्स मिळतील, याचा वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. तुम्ही आता व्हॉट्सअॅपचे (Whatsapp) आताचे व्हर्जन ४ डिव्‍हाइसमध्‍ये वापरु शकता, पण तुम्ही जर प्रीमियम सेवा घेतली. तर १० डिव्‍हाइसवर व्हॉट्सअॅप वापरु शकता.

व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) प्रीमियममध्ये वापरकर्त्यांना व्हॅनिटी युआरएलची सुविधाही मिळणार आहे. त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कस्टम लिंक जनरेट करण्याचा पर्याय मिळणार आहे.

जेव्हा एखादा वापरकर्ता व्हॅनिटी युआरएल तयार करतो, तेव्हा त्याच्या व्यवसायाचा फोन नंबर लपविला जात नाही. जेव्हा ग्राहक तुमच्याशी व्हाट्सअॅप (WhatsApp) द्वारे संपर्क साधतील तेव्हा त्यांना फोन नंबर दिसेल. व्यवसायाच्या नावासह एक युआरएल जनरेट केल्याने ते फायद्याचे ठरणार आहे. एखाद्या व्यावसायिकाला हे नवे फिचर फायद्याचे ठरणार आहे. आपल्या ग्राहकांसोबत जोडण्यासाठी या नव्या फिचरचा पावर करता येणार आहे. पण प्रिमीयम फिचरसाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागणार आहेत. याची घोषणा अजुनही मेटा ने केलेली नाही. पण या फिचरचा वापर व्यवसाय करणाऱ्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. (Whatsapp)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT