OYO New Feature Saam Tv
लाईफस्टाईल

OYO New Feature : OYO च नव फीचर ! फ्रीमध्ये करता येणार बुकिंग, कसे ते जाणून घ्या

New Feature Of OYO : OYO ने लोकांचा प्रवासा अधिक मनोरंजक आणि तणावमुक्त करण्यासाठी एक नवीन फीचर सादर केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Stay Now Pay Later : OYO ने लोकांचा प्रवासा अधिक मनोरंजक आणि तणावमुक्त करण्यासाठी एक नवीन फीचर सादर केले आहे, ज्या अंतर्गत वापरकर्ते त्यांचे हॉटेल आधी बुक करू शकतात आणि नंतर पैसे देऊ शकतात. या फीचरला स्टे नाऊ आणि पे लेटर असे नाव देण्यात आले आहे. बुकिंग केल्यानंतर कंपनी आपल्या यूजर्सना पेमेंटसाठी काही आठवड्यांचा वेळ देईल.

OYO ने त्याच्या अॅपवर नवीन स्टे नाऊ आणि पे लेटर फीचर (Feature) जोडले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते त्यांच्या बुकिंगसाठी नंतर पैसे देऊ शकतात. या फीचरमुळे झटपट पेमेंट करण्याच्या त्रासापासून सुटका मिळते. याव्यतिरिक्त, प्रवास करताना खर्चाचे टेन्शन घेणारे वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार प्रवासानंतर आरामात पैसे देऊ शकतात.

OYO च्या समर वेकेशन इंडेक्स 2023 नुसार, 82 टक्के भारतीयांनी या उन्हाळ्यात प्रवास करण्याची योजना (Scheme) आखली आहे, तर 92 टक्के देशांतर्गत प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत युजर्सची सोय लक्षात घेऊन कंपनीने हे फीचर आणले आहे. कंपनीने या फीचर्ससाठी Simpl या क्रेडिट-आधारित पेमेंट सेवेशी भागीदारी केली आहे.

'स्टे नाऊ पे लेटर' फीचर ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतची क्रेडिट मर्यादा देते, ज्याची 15 दिवसांच्या आत सेटलमेंट करता येईल. OYO अॅपच्या होम स्क्रीनवर हे फीचर ऍक्सेस करता येते.

हे फीचर सध्या अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे आणि लवकरच ते iOS वर देखील रिलीज होईल.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, OYO ची देशातील प्रीमियम हॉटेल्सची संख्या दुप्पट करण्याची योजना आहे असे जाहीर केले होते. ओयोने सांगितले होते की यावर्षी या हॉटेल्सची संख्या सुमारे 1,800 ने वाढवली जाईल. हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या प्रीमियम हॉटेल (Hotel) ब्रँडमध्ये टाउनहाऊस ओक, ओयो टाउनहाऊस, कलेक्शन ओ आणि कॅपिटल ओ यांचा समावेश आहे. Oyo ची देशात आधीच 1,800 प्रीमियम हॉटेल्स आहेत.

त्याच वेळी, मार्चमध्ये अशी बातमी आली होती की चालू आर्थिक वर्षात OYO चा महसूल 19 टक्क्यांनी वाढून 5,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल सुमारे 4,780 कोटी रुपये होता. पुढील आर्थिक वर्षात सुमारे 800 कोटी रुपयांचा समायोजित EBITDA साध्य करण्याचे ओयोचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT