ऑफिसमधील मित्रांचा आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
खासगी माहिती शेअर करणे धोकादायक ठरू शकते.
नोकरी सोडण्याची घोषणा लवकर करू नये.
काम करणाऱ्या बहुतांश लोकांसाठी त्यांच्या ऑफिसमधील मित्र आणि तिथलं वातावरण हा त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारा घटक असतो. हे स्वाभाविकच आहे, कारण दिवसाचा मोठा भाग आपण ऑफिसमध्ये घालवतो. त्यामुळे ऑफिसमधील काही मैत्री आपल्याला दिलासा देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या ठरतात.
चहा-कॉफीच्या ब्रेकमध्ये कोणाशी गप्पा मारायला मिळणं किंवा घरात-ऑफिसातला तणाव वाटून घ्यायला कोणी असणं हे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. मात्र, तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरी काही गोष्टी ऑफिसमधील मित्रांशी शेअर करणं टाळावंच लागतं. कारण, प्रत्येक गोष्ट सांगणं आवश्यकच असतं असं नाही.
ऑफिसच्या ठिकाणी आपली मर्यादा राखणं खूप महत्त्वाचं असतं. जास्त बोलणं किंवा खासगी माहिती उघड करणं कधी कधी उलटं परिणाम देऊ शकतं. गैरसमज, प्रतिष्ठेला धक्का, किंवा करिअरमध्ये समस्या यासारख्या गोष्टी घडू शकतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या ऑफिसमध्ये मित्रांना सांगणं टाळावं.
आपल्या ऑफिसमधील जवळच्या मित्राला आपली नोकरी सोडण्याबाबत सांगणं वाटू शकतं. पण हे सांगितल्याने अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. तुमचा मित्र नकळत ही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा मॅनेजमेंटने विचारल्यावर तो द्विधा मनःस्थितीत सापडू शकता. यामुळे तुमच्या सध्याच्या कामांवरून लक्ष हटू लागतं आणि तुमचा मित्रही ‘तुम्ही आता जाणार आहात’ या भावनेने तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर होऊ लागतो.
सहकाऱ्यांबद्दल किंवा बॉसबद्दल वाईट बोलणं काही वेळा मन हलकं करतं पण ते धोकादायकही ठरू शकतं. अगदी जवळच्या मित्रासमोरसुद्धा. कठीण दिवसानंतर थोडंसं मन मोकळं करणं समजण्यासारखं आहे, पण हे रोजचं झालं तर ते नकारात्मकतेची सवय बनते. यामुळे ‘निगेटिव्हिटी बायस’ वाढतो म्हणजेच नकळत आपण चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागतो. याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर आणि ऑफिसमधील नात्यांवर होतो.
पगाराबद्दल चर्चा करणं विशेषत: ऑफिसमधील मित्राशी, हे अनेकदा गैरसोयीचं ठरू शकतं. यामुळे नकळत तुलना जळफळाट किंवा आत्मसंशय निर्माण होण्याची शक्यता असते. तुमचा मित्र कमी पगार घेतोय असं वाटलं तर त्याला अन्याय झाल्याची भावना होऊ शकते आणि जास्त पगार घेतोय असं वाटलं तर त्याला कमीपणा येऊ शकतो.
काम टाळून बसण्याचं किंवा मजेत सांगणंही तुमच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतं. यामुळे तुम्ही जबाबदार नाही असा संदेश जातो आणि तुमचा मित्रही तुमचं अनुकरण करू लागला तर मॅनेजर किंवा इतर सहकारी तुमच्याविषयी नकारात्मक मत बनवू शकतात. ज्याचा परिणाम दोघांच्याही नोकरीवर होऊ शकतो.
ऑफिसमध्ये मित्रांना नोकरी सोडण्याबद्दल का सांगू नये?
ती माहिती लीक झाल्यास सध्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
बॉस किंवा सहकाऱ्यांविषयी तक्रार करणे का टाळावे?
नकारात्मक बोलणे मनावर आणि नात्यांवर वाईट परिणाम करते.
पगाराबद्दल चर्चा करणे का चुकीचे आहे?
पगाराची तुलना जळफळाट आणि आत्मसंशय निर्माण करू शकते.
काम न करता व्यस्त असल्याचं दाखवणे का टाळावे?
तुमची प्रतिमा बिघडू शकते आणि नोकरीचा धोका असतो.
ऑफिसमध्ये मर्यादा का राखणे गरजेचे आहे?
मर्यादा राखल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुरक्षित राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.