Foods to avoid before bed saam tv
लाईफस्टाईल

Foods to avoid before bed : झोपण्यापूर्वी 'हे' 4 पदार्थ खाऊच नका! खाल्ले तर काहीही करा, झोप लागणारच नाही

Foods to avoid before bed for sleep : पुरेशी आणि शांत झोप घेणे हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी काय खाता, याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. काही पदार्थ असे असतात, जे पचायला जड असतात किंवा शरीराला उत्तेजित करतात

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येकाला झोपेची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने ७-८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. पण अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, झोप येत नाही आणि आपण बेडवर असेच पडून राहतो. अशावेळी इच्छा असूनही आपल्याला झोप येत नाही. कधीकधी झोप येत नाही म्हणून आपण मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट हातात धरतो.

मात्र तुम्हाला माहितीये का की, तु्म्हाला झोप न येण्याचा त्रास हा तुमच्या खाण्याच्या सवयींमुळे असू शकते. तुम्ही रात्री जे काही खाता त्याचा परिणाम झोपेवर दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप येण्यामध्ये समस्या येतात.

फ्राईड फूड

रात्री उशिरापर्यंत झोप न येणं हे सामान्य आहे. काहींसाठी ते कामामुळे असू शकतं. मात्र तुम्हाला माहितीये तुम्हाला रात्री झोप न येण्यामागे तुम्ही खात असलेले तळलेले पदार्थ कारणीभूत ठरू शकतात. मात्र हे तळलेले पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. अशावेळी जेव्हा एखादी व्यक्ती झोपण्यासाठी बेडवर झोपते तेव्हा पोटात जडपणा जाणवतो. एकूणच शरीर विश्रांती घेण्याऐवजी जड जेवण पचवण्यात व्यस्त असतं. याचा झोपेवर परिणाम होतो.

तिखट पदार्थ

रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. हे पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त मसाले शरीराचं तापमान वाढवतात. जेव्हा तुम्ही विश्रांतीच्या शोधात बेडवर झोपायला जाता तेव्हा ही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

चॉकलेट

चॉकलेटमध्ये साखरेसोबत काही प्रमाणात कॅफेन देखील असतं. यामध्ये थियोब्रोमाइन देखील असते. हा घटक शरीरात सतर्कता वाढवतं. त्यामुळे रात्री चॉकलेट खाल्ल्यानंतर, तुम्हाला झोप येण्यामध्ये समस्या जाणवू शकते.

चहा आणि कॉफी

बऱ्याचदा लोकांना बरं वाटावं म्हणून ते चहा किंवा कॉफी पिणं आवडतं. पण यातून मिळणारे कॅफेन शरीरात अनेक तास टिकून राहतं. यामुळे झोपेचं शेड्यूल बदलण्याचा धोका असतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT