Shukrawar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Shukrawar Upay: घरातून नकारात्मकता होईल दूर; शुक्रवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय

Friday remedies to remove negativity: घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि सुख-समृद्धी आकर्षित करण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी काही सोपे उपाय केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं एक खास महत्त्व असतं. यावेळी शुक्रवार हा दिवस महालक्ष्मी देवीच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानण्यात येतो. या दिवशी देवीची भक्तिभावाने पूजा, दानधर्म, भजन-कीर्तन आणि हवन केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, केवळ पूजनच नाही तर शुक्रवारचं व्रत केल्यानेही अनेक सकारात्मक बदल घडतात.

शास्त्रांनुसार, जर कोणी व्यक्ती मनापासून आणि श्रद्धेने शुक्रवारी लक्ष्मीचं व्रत करत असेल तर त्याच्यावर महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांची कृपा राहण्यास महत होते. याशिवाय कुंडलीतील शुक्र ग्रह देखील बलवान होतो. आज शुक्रवार असून तुम्ही लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करू शकता ते पाहूयात.

महालक्ष्मीची पूजा

शुक्रवारी महालक्ष्मी देवीची पूजा करा. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. यावेळी घराची स्वच्छता ठेवणंही फार गरजेचं आहे. असं मानलं जातं की, ज्या ठिकाणी स्वच्छता आणि दिव्याचा प्रकाश असतो तिथे लक्ष्मीचं आगमन होतं. त्याचप्रमाणे या उपायामुळे घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक संकटांतून मुक्तता मिळण्यास मदत होते.

पांढऱ्या वस्तूंचं दान करा

शुक्रवारच्य दिवशी या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी फारच शुभ ठरणार आहे. यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या पदार्थांनी बनवलेल्या गोष्टी गरजूंना देऊ शकता.

कलश, तांदूळ, हळद आणि नाण्याचा उपाय

शुक्रवारी एक मातीचा कलश घ्या आणि त्यात तांदूळ भरून ठेवा. त्यात हळदीची गाठ आणि एक नाणं टाका. हा कलश देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये समाविष्ट करा आणि पूजा झाल्यावर गरजू व्यक्तीला दान करा. या उपायामुळे अडकलेले व्यवहार, आर्थिक अडचणी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. यामुळे तुमची बिघडलेली कामंही पूर्ण होण्यास मदत होते.

देवीची आरती करा

जर तुम्ही शुक्रवारचा उपवास करत असाल, तर पूजेनंतर लक्ष्मी देवीची आरती न चुकता करा. असं केल्याने उपवास आणि पूजन दोघांनाही पूर्ण फळ प्राप्त होतं. आरती ही भक्तीची परिपूर्णता मानली जाते. असं केल्याने घरात सकारात्मकता वाढू लागते

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT