Neck pain, Health issue  saam tv
लाईफस्टाईल

Neck Pain : मान दुखीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच! असू शकतो गंभीर आजार, वेळीच घ्या काळजी

Neck Pain Cancer Symptoms : ऑफिसमध्ये किंवा घरी बसताना आपण चुकीच्या पद्धतीने बसतो. झोपताना उशी किंवा अधिक उंच अशा वस्तूवर डोके ठेवतो.

कोमल दामुद्रे

Neck Pain Reason :

सकाळी झोपेतून उठल्यानंतर कधी कधी मान दुखू लागते. त्यामुळे दिवसभर आपल्याला दुखणे सतावू लागते. बदलेल्या जीवनशैलीनुसार कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही.

ऑफिसमध्ये किंवा घरी बसताना आपण चुकीच्या पद्धतीने बसतो. झोपताना उशी किंवा अधिक उंच अशा वस्तूवर डोके ठेवतो. ज्यामुळे मान दुखीचा त्रास उद्भवतो. अगदी कमी वयात मानदुखीची समस्या जडते. खूप वेळ मान वाकवून बसणे, स्नांयूचा ताण किंवा चुकीच्या पद्धतीने झोपल्यास या समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.

परंतु, औषधे (medicine) घेतल्यानंतर काही काळानंतर आपल्याला बरे वाटते. परंतु, ही वेदना सारखी होत असेल तर दुर्लक्ष करु नका. वारंवार मान दुखणे हे घशाच्या किंवा डोक्याच्या कर्करोगाचे (Cancer) लक्षणे असू शकते.

1. मान आणि डोक्याच्या कर्करोगाची लक्षणे (Symptoms) कोणती?

  • घसा खवखवणे

  • डोकेदुखी

  • मानेचे दुखणे

  • श्वास घेण्यास किंवा बोलण्यात अडचण

  • तोंडात किंवा जिभेवर सतत फोड येणे

  • मान सूजणे

  • नाक्तातून रक्त येणे

  • कान दुखणे

  • गिळण्यात किंवा चघळण्यात अडचण

  • चेहऱ्यावर किंवा दात दुखणे

2. मान दुखीचे कारण काय?

1. तंबाखूचे सेवन

तंबाखू हे घशाच्या कर्करोगाचे सर्वात सर्वात मोठे कारण आहे. याच्या सेवनाने घशाचा आणि डोक्याचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करू नये.

2. घातक रसायनांच्या संपर्कात येणे -

पेंटचा वास, लाकूड धूळ इत्यादींच्या संपर्कात बराच वेळ जर आपण घालवत असू तर घसा आणि डोक्याचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे अशी रसायने टाळण्याचा प्रयत्न करा.

3. तोंडाची स्वच्छता-

तोंडाच्या आरोग्याची काळजी न घेतल्याने मान आणि डोकेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Varvarche Vadhu Var: लग्नाआधी एकदा पाहाचं ! लग्नावरचं हलकं फुलकं, प्रभावी नाटक - 'वरवरचे वधू वर'

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

GK: रडताना डोळ्यांतून अश्रू का बाहेर पडतात? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT