Navratri Festival Tour Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Festival Tour : IRCTC चा नवा प्लान! ८ हजारात करता येणार वैष्णोदेवीचे दर्शन, बुकिंग प्रोसेस जाणून घ्या

Navratri IRCTC Tour Package : तुम्ही देखील फिरण्याचा प्लान करत असाल आणि वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे असेल तर IRCTC च्या नवा टूर प्लानला भेट देऊ शकता.

कोमल दामुद्रे

IRCTC Vaishno Devi Package 2023 :

सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. नवरात्रीच्या प्रत्येक नऊ दिवसात आपल्याला दुर्गादेवीचे नऊ रुप पाहायला मिळतात. या नऊ दिवसांत विविध देवींच्या रुपांची आराधना करतात.

अनेकजण शक्तीपीठांना भेट देण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील फिरण्याचा प्लान करत असाल आणि वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे असेल तर IRCTC च्या नवा टूर प्लानला भेट देऊ शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

IRCTC चे हे पॅकेज अतिशय परवडणाऱ्या किमतीत आहे. या पॅकेजची किमत ७२९० रुपये असून प्रवाशांना वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास (Travel) करण्याची संधी मिळेल. तसेच इतर सुविधा देखील यात मिळणार आहे.

1. पॅकेजचे नाव

IRCTC च्या या पॅकेजचे नाव माता वैष्णोदेवी बाय वंदे भारत आहे. हे पॅकेज एक रात्र आणि दोन दिवसांसाठी आहे. हे पॅकेज १८ ऑक्टोबरपर्यंत खरेदी करता येईल. पॅकेज दरम्यान, तुम्हाला वंदे भारत ट्रेनच्या क्लास चेअर कारमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता नवी दिल्ली येथून ही ट्रेन सुटेल.

2. पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मिळतील?

या पॅकेजमध्ये (Package) हॉटेल, 1 नाश्ता, 1 लंच, 1 डिनर आणि ट्रेन तिकीट इत्यादींचा समावेश आहे. ट्रेन कटरा येथून दुपारी 2 वाजता पोहोचेल. तसेच रेल्वे स्थानकावरुन भाविकांना हॉटेलमध्ये पाठवण्यात येईल. त्यानंतर बाणगंगा येथे नेण्यात येईल. तेथून भाविकांना वैष्णोदेवीची यात्रा सुरू करता येईल. हॉटेलमधून चेकआउट दुपारी 2 च्या सुमारास केले जाईल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरु होईल.

3. पॅकेजेस 7,290 रुपयांपासून सुरू होतात

तुम्हाला ट्रिपल शेअरिंगसाठी 7,290 रुपये खर्च करावे लागतील. डबल शेअरिंगसाठी तुम्हाला ७,६६० रुपये आणि सिंगल बुकसाठी ९,१४५ रुपये द्यावे लागतील. याशिवाय 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेड घेण्यासाठी 6,055 रुपये आणि बेड न घेतल्यास 5,560 रुपये मोजावे लागतील. हे टूर पॅकेज बुक करायचे असेल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता https://www.irctctourism.com/indian-domestic-holidays/delhi-tour-packages

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT