Navratri Fast Low Calorie Food Saam TV
लाईफस्टाईल

Navratri Fast Low Calorie Food : नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवासाचे 'हे' पदार्थ खा, राहाल फिट !

या पदार्थांचे सेवन करुन स्वत:ला ठेवा ऊर्जावान

कोमल दामुद्रे
Rajgira chilla

१. राजगीऱ्याचा चिल्ला

राजगिऱ्याचे पीठ हे चवदार असते. या पिठात आपण बटाटा, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कुट व हिरवी मिरची घालून आपण याचा चिल्ला बनवू शकतो. व दह्यासोबत खाऊ शकतो.

Shikanji

२. शिंकजी -

या दिवसात स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. अशावेळी आपण सबज्याचे पाणी सतत पिऊ शकतो. ज्यामुळे जास्त तहान लागत नाही आणि पोट भरलेले राहते.

Makhane Kheer

३. मखान्याची खीर

मखन्याची खीर सुद्धा खूप चविष्ट लागते, जर तुम्हाला हवे असेल तर दूध उकळवून त्यात मखाने, साखर किंवा ड्रायफ्रुट्स घालू शकता.

Sabudana Kichdi

४. साबूदाण्याची खिचडी

साबूदाण्याती खिचडी हा सगळ्यात बेस्ट पर्याय प्रत्येकासाठी असतो. बनवायला अगदी सोपी व चविष्ट लागते, यामुळे पोट देखील भरलेले राहाते.

Makhane And Peanuts

५. मखाने आणि शेंगदाणे

मखाने आणि शेंगदाणे ही उत्तम गोष्ट आहे. हे दोन्ही पदार्थ उपवासात खाल्ल्याने ऊर्जा पातळी टिकून राहते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते तळल्यानंतर खाऊ शकता किंवा तुम्ही ते चहासोबत घेऊ शकता.

Fruits

६. फळे

बरेच लोक फळ खाणारे देखील असतात, तुम्ही कोणतेही फळ एक किंवा दोनदा खाऊ शकता. तसे, लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने ऊर्जा राहते, परंतु अनेकांना गॅस होतो, त्यामुळे पाणीदार फळे खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तहानही नाहीशी होते.

Sabudana Chivda

७. साबुदाण्याचा चिवडा

उपवासाच्या दिवशी थोडा आंबट व गोड असा साबुदाण्याचा चिवडा खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहाते. तसेच आपण याचे सेवन केल्यास पोटही भरलेले राहिल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT