Weak Bones Saam TV
लाईफस्टाईल

Weak Bones : खाण्यापिण्याच्या या चुकीच्या सवयींमुळे हाडं होतात ठिसूळ, या पदार्थांना आज करा डाएटमधून आउट

Natural Ways to Build Healthy Bones : बदलेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाडे दुखीच्या समस्यांना समोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Bones Weak :

हिवाळ्यात बरेचदा चालताना, उठता-बसता हाडांमधून आवाज येतो. अशावेळी मजबूत हाडांसाठी संतुलित आहार हा अधिक महत्त्वाचा असतो. बदलेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाडे दुखीच्या समस्यांना समोरे जावे लागते.

वाढत्या वयात हाडे दुखीच्या समस्या अधिक प्रमाणात बळावतात. अशावेळी शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हाडे हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शरीराला योग्यप्रकारे रचना मिळते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाडे कमकुवत होतात. त्यामुळे जाणून घेऊया कोणते पदार्थ आहारातून वगळायला हवे हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. गोडाचे पदार्थ

जास्त प्रमाणात गोडाचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर (Health) परिणाम होतो. साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी अंत्यत हानिकारक मानले जाते. कॅन केलेले किंवा पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये साखर (Sugar) मिसळली जाते. ज्यामुळे हाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

2. सॉफ्ट ड्रिंक्स

आपल्यापैकी बहुतांश लोकांना सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची आवड असते. साखरेसोबत त्यात फॉस्फोरिक अॅसिड असते. जे शरीरातून कॅल्शियम शोषून घेते. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.

3. लोह

लोह आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) आहे. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्यास हाडांसाठी हानिकारक ठरते. शरीरातील अतिरिक्त लोह कॅल्शियमच्या शोषणात अडथळा आणते. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.

4. मीठ

मीठ नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करावे. जास्त मीठ खाल्ल्याने हाडे कमजोर होतात. बरेच लोक प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूड खातात. ज्यामध्ये सगळ्यात जास्त मीठ असते. ज्यामुळे हाडांच्या गंभीर समस्यांना समोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

SCROLL FOR NEXT