Narali Purnima 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Narali Purnima 2023 : श्रावणी पौर्णिमेला करतात समुद्रासह या देवतांची पूजा, धार्मिक कारण आहे खास

Narali Purnima Special : श्रावणातील ही पौर्णिमा हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

Shraddha Thik

Narali Purnima : श्रावणातील ही पौर्णिमा हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतात काही राज्यांमध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या विशेष दिवशी वरुण देवाची पूजा (Puja) केली जाते. असे मानले जाते की नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचा देव वरुण देव मच्छीमारांवर प्रसन्न होतो. मच्छीमार हा सण साजरा करतात जेणेकरून त्यांच्या घरात आनंद, शांती आणि आशीर्वाद सदैव राहील.

नारळी पौर्णिमेला वरुण देवीची पूजा केली जाते -

नारळी पौर्णिमेला 'श्रावण पौर्णिमा' असेही म्हणतात. कारण या दिवशी पूजेत नारळाचा विशेष वापर केला जातो. या दिवशी लोक वरुण आणि महासागरातील देवतांची पूजा करतात.

या दिवशी लोक ताजे नारळ, फुले, अक्षता, सुगंधित धूप, आरतीचे ताट आणि प्रसाद घेऊन समुद्रकिनारी जातात आणि त्यांना अर्पण करतात. यासोबतच पाण्यात अंघोळ करण्याचेही पारंपरिक महत्त्व आहे.

या दिवशी काही लोक (People) वरुण देवाशिवाय शिव आणि पार्वतीची पूजा करतात आणि शिवलिंगाला पाणी, दूध, तूप आणि नारळाच्या पाण्याने स्नान घालतात. हा दिवस शिव-पार्वतीच्या महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे काही ठिकाणी शिवलिंगाची देवी पार्वतीसोबत जोडून पूजा केली जाते.

धार्मिक सणांसोबतच लोक हा दिवस रंगीबेरंगाचे कपडे (Cloths), जत्रा आणि आनंदाने साजरा करतात. लोक संगीत आणि विशेषतः लोकनृत्य सादर करून या दिवसाचा आनंद घेतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी भजन, कीर्तन, आरती आणि उपासनेच्या निमित्ताने लोक जमतात आणि हा सण साजरा करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : त्रास देणाऱ्याला सोडू नका, उभा कार्यक्रम करा - मनोज जरांगे

Wardha News : नोटांचे स्क्रॅप भरून जाणाऱ्या ट्रकला आग; कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना

Success Story: कधी-काळी एका खोलीत राहून काढले दिवस, आज आहेत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा काय आहे त्यांचा बिझनेस?

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जतमध्ये भाजपला पाठिंबा!

SCROLL FOR NEXT