Nagpur Tourism  Saam TV
लाईफस्टाईल

Nagpur Tourism : नागपूरमधील नयनरम्य ठिकाणे; आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Tourist Places in Nagpur : पर्यटक नागपूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जात असतात. नागपूर शहर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कधीच मागे राहत नाही.

Ruchika Jadhav

महाराष्ट्रातील नागपूर हे एक प्रमुख शहर आहे. नागपूर हे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर आहे. नागपूर शहराला महाराष्ट्राची राजधानी सुद्धा म्हटले जाते. अनेक पर्यटक नागपूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला जात असतात. नागपूर शहर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कधीच मागे राहत नाही.

नागपूरला संत्र्याच्या रसाळ फळामुळेही ओळखलं जातं. वीकेंडच्या सुट्टीचा पुरेपुर आनंद लुटण्यासाठी नागपूर हे एक उत्तम ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि ऐतिहासिक वारसा असलेले हे नागपूर शहर त्याच्या सुंदरतेमुळे सर्वच पर्यटकांना वेड लावण्याचे काम करत असते. जर तुम्ही सुद्धा नागपूरच्या ट्रिपबद्दल विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी आहे. या माहितीमुळे तुमची ही नागपूर ट्रिप फार सोपी होणार आहे. तुमचा हा अविस्मरणीय प्रवास तुम्ही आनंदाने इन्जॅाय करु शकता.

दीक्षाभूमी स्तूप

नागपुरातील दीक्षाभूमी स्तूप हे बौद्ध धर्मातील प्रसिद्ध स्थळ आहे. दीक्षाभूमी स्तूपाची उंची १२० फूट असून त्याला आशियातील सर्वात मोठा स्तूप म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी हा स्तूप बांधण्यात आला होता. डॉ. आंबेडकरांसोबत साठ हजार नागरिकांनी देखील त्यावेळी बौद्ध धर्म स्वीकारला. हा दीक्षाभूमी स्तूप संगमरवर, ग्रॅनाइटपासून बनलेला आहे. हा स्तूप अनेक पर्यटकांचा अतिशय प्रेक्षणीय स्थळ म्हणून ठरला आहे.

रामटेक किल्ला

नागपूर शहराच्या गर्दीपासून दूर असलेला रामटेक किल्ला आहे. हा किल्ला टेकडीच्या माथ्यावर असून त्यात एक पौराणिक इतिहासाचे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा विशेष उल्लेख म्हणजे भगवान राम या मंदिरात विश्रांती घेण्यासाठी थांबले होते. म्हणून या मंदिराचे मुख्य देवता भगवान राम आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॅाट म्हणून ठरणार आहे.

ड्रॅगन पॅलेस मंदिर

ड्रॅगन पॅलेस हे नागपूर शहरापासून २० किलो मीटर अंतरावर आहे. या पॅलेसमध्ये अनेक भक्त खूप वेळ बसून बौध्द प्रार्थनेचा जप आणि ध्यान करत असतात. या मंदिराची स्थापना १९९९ मध्ये जपानमधील ओगावा समाजाने एका देणगी निधीतून केली आहे. ड्रॅगन पॅलेसच्या मंदिरात बुध्दाची चंदनाची मूर्ती आहे. या मंदिराला नागपूरचे लोटस टेम्पल ही म्हणतात.

अक्षरधाम मंदिर

नागपूर शहरातील स्वामीनारायण मंदिराला अक्षरधाम मंदिर म्हणून ओळखले जात आहे. हे मंदिर रिंगरोडवर असून त्याला भेट देण्याची वेळ संध्याकाळची आहे. अक्षरधाम मंदिर आता नुकतेच बांधलेले असून त्या मंदिरात अनेक सोयीसुविधा आहेत. जसे की स्वंपाकघर, पार्किंग, रेस्टॅारंट आणि मुलांच्या मनोरंजनाची सुविधा आहे. हे भव्य मंदिर पर्यटकांच्या मनाची शांती करण्यासाठी प्रेरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT