Health officials collect samples from Nagpur hospitals as NIV begins probe into mysterious child deaths linked to brain fever-like symptoms. Saam Tv
लाईफस्टाईल

Nagpur Brain Fever: मेंदूज्वर सदृश्य आजाराचा वाढला धोका, मेंदूज्वराने 10 बालकांचा बळी

Mystery Illness Strikes Nagpur and MP: नागपूर आणि लगतच्या मध्य प्रदेशात झालेले बालमृत्यू हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान बनले आहेत. अशातच मेंदूज्वर सदृश्य लक्षण असलेल्या आजाराने बालकांचा मृत्यू झाल्याने नवा पेच निर्माण केलाय. बालकांच्या मृत्यूचं गूढ नेमकं काय आहे?

Suprim Maskar

नागपूरमध्ये आरोग्य विभागासमोर मेंदूज्वर सदृश्य आजाराचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शहर आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयात या आजाराचे 20 ते 22 रुग्ण दाखल झालेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 1 ते 16 वर्ष वयोगटातील दहा मुलांचा मृत्यू झालाय. यात मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून उपचारासाठी आणलेल्या सहा मुलांचाही समावेश आहे. दरम्यान राज्यात 4 बालकांचा या आजारामुळे मृत्यू झालाय...

बालकांना मेंदूज्वराचा धोका

नागपूर शहर – 2

नागपूर ग्रामीण – 3

अकोला – 1

भंडारा – 2

गडचिरोली – 1

दुसरीकडे संशयित रुग्णांचे नमुने पुण्याच्या NIV म्हणजेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या टीमने गोळा केले आहेत. मृत बालकांचे स्थानिक लॅबमध्ये मेंदूज्वर, चंद्रिका आणि हरपिक्स व्हायरस अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बालकांच्या मृत्यूचं नेमकं कारण NIV चे तज्ज्ञ शोधणार आहेत... मध्य प्रदेशातून आलेल्या मुलांमध्ये सुरुवातीला साधा ताप, सर्दी-खोकला, उलटी आणि मूत्र कमी होणे अशी लक्षणं दिसली. पण काही दिवसांतच प्रकृती झपाट्यानं खालावली आणि रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान आरोग्य विभाग अंतिम निष्कर्षावर पोहचला नसला तरी ही प्रकरणं अक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम (AES) शी संबंधित असावीत, अशा संशय आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये बालकांच्या मृत्यूमागे औषधांची भेसळ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे नागपुरातही त्यादृष्टानेही तपास सुरू झालाय. NIV च्या अहवालात नेमकं काय कारण समोर येतंय ते पाहणं महत्वाचं आहे. कारण त्यानंतरच बालकांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT