Health tips, muscle strength
Health tips, muscle strength ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Muscle Health : शरीरातील स्नायू बळकट असणे महत्त्वाचे आहे का ? त्याचे कार्य कसे असते ? वयोमानानुसार स्नायूंचे आरोग्य कसे बदलते ?

कोमल दामुद्रे

Muscle strength : स्‍नायू शरीराच्‍या एकूण लीन बॉडी मासचे (म्‍हणजेच एलबीएम) सर्वात मोठे घटक आहेत, जे चरबीव्‍यतिरिक्‍त शरीराच्‍या प्रत्‍येक कार्यामध्‍ये मदत करतात. आपल्या शरीरामध्ये ५० ते ६० टक्के वजन हे स्नांयूचे आहे.

हे देखील पहा -

स्‍नायू हालचाल करण्‍यामध्‍ये, तसेच संतुलन राखण्‍यामध्‍ये मदत करतात. शारीरिक शक्‍ती, अवयवांचे कार्य, त्‍वचेची अखंडता, रोगप्रतिकारशक्‍ती आणि जखम बरी होण्यासाठी स्‍नायू आरोग्‍यदायी असणे महत्त्वाचे आहे. म्‍हणून आरोग्‍यदायी स्‍नायू आपले वय वाढत असताना जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्‍यासाठी आवश्‍यक आहेत. असे अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायाच्‍या वैद्यकीय व वैज्ञानिक घडामोडींचे प्रमुख डॉ. इरफान शेख यांनी सांगितले आहे.

स्नायूंच्या आरोग्यामुळे आपल्या वृध्द होण्याची लक्षणे जाणवू शकतात. म्‍हणून स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम कसे ठेवावे आणि त्‍याचा तुमच्‍या जीवनावर काय परिणाम होतो हे माहित असणे महत्त्वाचे आहे. तुमचे स्‍नायू व स्‍नायूंच्‍या आरोग्‍याबाबत माहित असाव्‍यात अशा काही गोष्‍टी पुढीलप्रमाणे:

१. वाढत्‍या वयासह स्‍नायूशक्‍ती कमकुवत होते

वयाच्‍या ४०व्‍या वर्षांपासून प्रौढ व्‍यक्‍तींची स्‍नायूशक्‍ती प्रतिदशक जवळपास ८ टक्क्यांनी कमी होऊ शकते. वयाच्‍या ७० वर्षांनंतर हे प्रमाण दुप्‍पट होऊ शकते. खरेतर अयोग्‍य पोषण, इतर आजार आणि गंभीर आजारांमुळे स्‍नायूशक्‍ती वेगाने कमकुवत होते. स्‍नायूशक्‍ती कमी झाल्‍याने ऊर्जा पातळी व हालचालींवर परिणाम होऊ शकतो, खाली पडणे व फ्रॅक्‍चर्सचा धोका वाढू शकतो आणि आजार किंवा शस्‍त्रक्रियेमधून मंद गतीने बरे होण्‍याची शक्‍यता वाढू शकते. स्‍नायू आरोग्‍यदायी असल्‍यास आपण सहजपणे हालचाल करू शकतो आणि शरीर बळकट ठेवू शकतो. आपले स्‍नायू बळकट असतील तर सांधे देखील उत्तमप्रकारे कार्य करू शकतील. गुडघ्‍याभोवती असलेले स्नायू कमकुवत झाले तर गुडघ्‍यांना दुखापती होण्‍याची शक्‍यता असते. आरोग्‍यदायी स्‍नायू आपल्याला संतुलन राखण्‍यामध्‍ये देखील मदत करतात.

२. स्‍नायू व रोगप्रतिकारशक्‍ती

शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ ठेवायची असेल आणि जीवाणूजन्‍य व संसर्गजन्‍य आजारांचा धोका कमी करायचा असेल तर स्‍नायूंच्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करू नका. स्नायूंमधील ऊती रोगप्रतिकार पेशी कार्यान्वित करण्‍यामध्‍ये भूमिका बजावतात. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी आपल्‍या आहाराकडे लक्ष द्या आणि आहारांमध्‍ये (Food) लीन प्रथिने, फळे, पालेभाज्‍या, कडधान्‍ये, नट्स व बीन्‍स आणि कमी मेद असलेल्‍या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. हे खाद्यपदार्थ कॅल्शियम, जीवनसत्‍व (Vitamins) ड, लोह यातून मिळेल.

३. स्‍नायूशक्‍ती कमकुवत होणे व रिकव्‍हरी

आपले स्‍नायू आजारामधून बरे होत असताना शक्‍ती व ऊर्जेसाठी महत्त्वाचे स्रोत आहेत. आपण आजारी किंवा हॉस्पिटलाइज असू तर आपल्या शरीराला बरे होण्‍यासाठी प्रथिनांसारखे पौष्टिक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, ज्‍यामुळे स्‍नायूंमधील उतींचे नुकसान होते. अशा प्रकारचे स्‍नायूंचे नुकसान आजारातून बरे होण्यास उशीर होणे, जखमा बरे होण्याचे काम मंद होणे आणि जीवनाचा दर्जा कमी होण्याशी संबंधित आहे.

४. कमकुवत झालेली स्‍नायूशक्‍ती ओळखणे

हाताच्‍या ग्रिपची शक्‍ती हा स्‍नायूशक्‍तीचे मूल्‍यांकन करण्‍याचा सुलभ मार्ग आहे. तसेच आपल्या स्‍नायूंची शक्‍ती तपासण्‍यासाठी चेअर चॅलेंज टेस्‍ट देखील सुलभ मार्ग आहे. ४० ते ६० वर्षे वयोगटातील व्‍यक्‍ती ही चाचणी करण्‍यासाठी जवळपास ४ ते १३ सेकंद वेळ घेऊ शकताते. अधिक माहितीसाठी आणि ही चाचणी करण्‍यासाठी तुम्‍ही www.muscleagetest.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

५. स्‍नायू व शक्‍ती पुन्‍हा बळकट करणे

स्‍नायूशक्‍ती कमकुवत होणे नैसर्गिक आहे, पण त्‍यांचा वाढता दर आणि नकारात्‍मक परिणाम नसावेत. स्‍नायूशक्ती पुन्‍हा बळकट करण्‍यासाठी आणि स्‍नायू कमकुवत झाल्यामुळे होणा-या संसर्गाच्‍या दीर्घकालीन लक्षणांचे निर्मलून करण्‍यासाठी या उपायांमध्‍ये अधिक उशीर करू नका. हे ताकदीचे व्‍यायाम आणि पुरेसे प्रथिने व पौष्टिक घटकांनी युक्‍त परिपूर्ण, संतुलित आहाराच्‍या संयोजनासह संपादित करता येऊ शकते. पौष्टिक घटकासंदर्भात कॅल्शियम, जीवनसत्‍व ड, जीवनसत्‍व ब१२ व जीवनसत्‍व ब३ हे स्‍नायूंचे आरोग्‍य प्रबळ राखण्‍यासाठी काही प्रमुख पौष्टिक घटक आहेत.

स्‍नायू जीवनाच्‍या अनेक पैलूंमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आपल्या स्‍नायूंची शक्‍ती तपासण्‍यासाठी व सुधारण्‍यासाठी अनेक प्रभावी मार्ग आहेत. स्‍नायू कमकुवत होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी आरोग्‍यदायी पर्यायांसंदर्भात तुमच्‍या डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई! अनेक गावातील अवस्था अत्यंत बिकट

Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Today's Marathi News Live : सांगलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT