Mumbai's First Digital Bus Stop Saam Tv
लाईफस्टाईल

Mumbai's First Digital Bus Stop : मुंबईतील पहिले डिजिटल बस स्टॉप ! आता सुरक्षित प्रवासासह वाचनाचीही सुविधा, जाणून घ्या कुठे आहे ?

First Digital Bus Stop : बस स्टॉपवर अनेकदा आपल्याला बसची प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी बस स्टॉपवर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai's First Bus Stop : दररोज लाखो लोक मुंबई बेस्ट बसमधून प्रवास करतात आणि त्यांच्या संबंधित स्थळावर पोहोचतात. बस स्टॉपवर अनेकदा आपल्याला बसची प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी बस स्टॉपवर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो.

अनेकदा स्टॉपची अवस्थाही बिकट असते. तेथे थांबणेही कठीण होऊन बसते. प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी बेस्टने लोकांचा (People) प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवनवीन योजना आणल्या आहेत.

कुठे आहे बस स्टॉप -

मुंबईत (Mumbai) वरळीतील बेस्ट बस स्टॉपचे रूप बदलून टाकले आहे. नेहरू तारांगणच्या स्टॉपवर वाचनालय, मोबाईल (Mobile) चार्जिंग सेंटर, पोस्ट बॉक्स अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत तो सुसज्ज केला आहे.

बसस्थानकावर वाचनालयाची सोय -

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) च्या या बसस्थानकावर आधुनिक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वरळी बसस्थानकावर वाचनालय उभारण्यात आले असून तेथे त्यांना ही पुस्तके वाचता येतील. यासोबतच बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे (Camera) आणि चार्जिंग पॉईंटचीही सोय करण्यात आली आहे. याशिवाय बसस्थानकावर महिला (Women) प्रवाशांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे -

महिलांना बसस्थानकावर सुरक्षित वाटत असल्यास त्या सुरक्षा अलार्म वापरू शकतात. महिलांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकावर रक्षक ठेवण्यात आले आहेत. याशिवाय स्टॉपवर क्यूआर कोडही बसवण्यात आला आहे. प्रवासी या क्यूआर कोडचा वापर करून स्टॉपच्या आसपासची लोकप्रिय ठिकाणे आणि उपलब्ध स्वच्छतागृहांची माहिती मिळवू शकतात.

35 लाखांत बसस्थानकाचे पुनर्बांधणी -

या बसस्थानकाला नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाने (NSCI) नेत्रदीपक देखावा दिला आहे. 35 लाख रुपये खर्चून डिजिटल बसचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईतील सुमारे तीन हजार बसथांब्यांचे या पद्धतीने आधुनिक बसथांब्यांमध्ये रूपांतर करण्याची तयारी सुरू आहे. एका बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 20 ते 35 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT