Mucositis Causes and Treatment Saam TV
लाईफस्टाईल

Mucositis Causes and Treatment : हिनाला झालेल्या 'म्यूकोसिटिस'ची लक्षणे काय? या गंभीर आजारावर अशी करा मात

What is the Best Treatment for Mucositis? हिना खानला म्यूकोसिटिस' आजाराने ग्रासले आहे. या आजाराची लक्षणे आणि उपाय काय आहे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याने त्यावर ती उपचार घेत आहे. हा उपचार सुरू असतानाच आता तिला आणखी एक म्यूकोसिटिस नावाचा आजार असल्याचं निदान झालं आहे. हिनाला झालेला आजार नेमका काय आहे? तो कसा होतो? त्याची लक्षणे आणि यातून बरे होण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

म्यूकोसिटिस काय आहे?

कॅन्सरवर उपचार घेत असताना काही व्यक्तींना हा आजार होतो. यामध्ये तोंडात, जिभेवर किंवा अन्न नलिकेत सुज येते, तसेच नंतर जखम तयार होते. शक्यतो हा आजार कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो.

म्यूकोसिटिसची लक्षणे काय?

ओठांना सुज येणे.

जिभेवर किंवा जिभेखाली सुज येते आणि त्रास होतो.

अन्न नलिकेमध्ये सुज येते आणि घसा दुखू लागतो.

तोंडात प्रमाणापेक्षा जास्त लाळ जमा होते.

तोंडात तसेच घशात सफेद डाग पडून जखम तयार होते.

दात दुखतात तसेच हिरड्यांमधून रक्त येऊ लागतं.

म्यूकोसिटिस आजारावर उपाय काय?

कॅन्सरच्या रुग्णात अशी लक्षणे दिसताच संबंधित डॉक्टरांशी सपर्क साधावा.

त्यानंतर डॉक्टरांकडून या जखमांचे निरिक्षण करून याची कॅटिगीरी ठरवली जाते.

यावर इन्फेक्शन कमी करण्यासाठी आधी सौम्य औषध दिलं जातं.

तसेच औषधांमध्ये आणि डाएटमध्ये बदल केला जातो.

ओरल हायजीनची काळजी घेण्यास सांगितले जाते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT