Health problems that cause morning tiredness AI Image
लाईफस्टाईल

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

Morning Fatigue Sleep Health News : रात्री ७ ते ८ तास झोप घेऊनही सकाळी थकवा आणि आळस जाणवतोय? थकव्याची ६ महत्त्वाची कारणे आणि उत्साही राहण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय.

Alisha Khedekar

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक कामे करतो. या कामानंतर घरी आल्यावर शरीराला मात्र पुरेशा आरामाची गरज असते. परंतु अनेकदा रात्री ७ ते ८ तासांची पूर्ण झोप घेऊनही सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. अनेकदा पुरेशी झोप होऊनही शरीरात उत्साह जाणवत नाही. सकाळी उठल्यावर आळस येणे, डोळ्यांवर झोप असणे, डोके जड वाटणे किंवा दिवसभर थकल्यासारखे वाटणे, अशा समस्या अनेकांना जाणवतात. मात्र, यामागे केवळ अपुरी झोप हेच कारण नसते. आपल्या रोजच्या सवयी, आहार आणि आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

रात्री वारंवार झोपमोड होणे हे थकव्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. झोपण्याची आणि उठण्याची वेळ रोज बदलत असेल, तर शरीराचे झोपेचे चक्र बिघडू शकते. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी मोबाईलचा जास्त वापर करणे, रात्री उशिरा जेवणे आणि झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिणे यामुळेही झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. शरीरात पाण्याची कमतरता असणे, आहारातून पुरेसे पोषक घटक न मिळणे आणि व्यायामाचा अभाव यामुळेही सकाळी थकवा जाणवू शकतो. शरीरात लोह, व्हिटॅमिन बी१२ किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. याशिवाय मानसिक तणाव, चिंता, नैराश्य आणि दिवसभर शारीरिक हालचाल कमी असणे यांचाही शरीराच्या ऊर्जेवर परिणाम होतो.

काही वेळा थायरॉईडचा त्रास, रक्तातील साखरेचे असंतुलन, हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि काही औषधांचे दुष्परिणाम यामुळेही थकवा जाणवतो. रात्री मोठ्याने घोरणे किंवा स्लीप अ‍ॅप्नियासारख्या झोपेच्या विकारांमुळेही पुरेशी झोप घेऊन शरीराला आवश्यक विश्रांती मिळत नाही. सकाळी उत्साही वाटण्यासाठी सर्वप्रथम झोपेची वेळ निश्चित करा. दररोज ठरावीक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा.

झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळा. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. नियमित व्यायाम आणि चालण्याची सवय लावा. मात्र, पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण काही वेळा हा थकवा शरीरातील एखाद्या आरोग्य समस्येचा संकेत असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नवा ट्विस्ट! विखे पाटलांसह मनोज जरांगेंनाही घेरलं; थेट राजीनामा...

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील अमेझॉन , बिग बास्केट, डार्क स्टोरवर एफडीएची धडक कारवाई

Heath Tips : तोंडातून दुर्गंधी येतेय, किडनीशी काय आहे संबंध?

NEET पेपरफुटी प्रकरण: १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून सुनावणी होणार सुरू

LPG Gas Connection : LPG गॅसचा मोठा नियम! एका घरात किती सिलिंडर कनेक्शनला परवानगी?

SCROLL FOR NEXT