Control Blood Sugar Naturally with Moringa Leaves google
लाईफस्टाईल

Blood Sugar Control: रक्तातील साखर 7 दिवसांत कंट्रोल! शेवग्याच्या पानांचा हा रामबाण उपाय तुम्हाला माहिती आहे का?

Diabetes Care: शेवग्याच्या पानांचे पाणी रोज प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, इम्युनिटी वाढते, पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. डायबेटीससाठी हा प्रभावी घरगुती उपाय आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • शेवग्याच्या पानांनी शुगर कमी होते

  • डायबेटीजच्या रुग्णांसाठी शेवगा फायदेशीर

  • शेवगा खाण्याची योग्य पद्धत

आपण आत्तापर्यंत किती प्रमाणात साखर खाल्ली असेल याचा विचार कधी केलाय का? साखर ही आपण नुसती खात नाही, पण आपल्या रोजच्या आहारामध्ये कितीतरी प्रमाणात तिचा वापर होत असतो. याने कमी वयातच आपल्याला रक्ताची पातळी वाढल्याचं आढळतं. मग आपण पूर्णपणे साखर बंद करतो.

तज्ज्ञांच्या मते, पूर्णपणे साखर बंद केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमची ब्लड शुगर लेव्हल कमी करु शकता. त्यात आता उन्हाळा आहे. या दिवसात पालेभाज्याही आपल्याला सहज मिळतात. त्यातलीच एक भाजी म्हणजे शेवग्याची पाने. ही भाजी तुम्हाला भरपूर फायदे मिळवून देते. तर ब्लड शुगर वाढलेल्या लोकांसाठी ही तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. पण याची पद्धत तुम्ही समजून घेतली पाहिजे.

सगळ्यात आधी शेवग्याची पानं स्वच्छ धुवून घ्या. मग ती उन्हात वाळवून तिची पावडर करुन घ्या. मग १ ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये ती मिक्स करुन घ्या. हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. ही

शेवग्याची पानांचा अनेक फायदे असतात. याने डायबेटीजच्या रुग्णांना जास्त फायदा होतो. रक्तातली साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे औषधी पेय सेवन केलं जाऊ शकतं. शेवग्याच्या पानांच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असतं. त्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगीच्या पोटाच्या समस्यां कमी होतात. तुम्हाला सांधे दुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे पाणी रोज सेवन करु शकता. याच्या पोषक गुणधर्मांनी कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुम्ही नक्कीच या पाण्याचं सेवन करा. याने तुमचे चयापचय क्रिया वाढते. तसेच तुमचं लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी शेवग्याची पानं फायदेशीर ठरतात. तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही याची भाजी सुद्धा खाऊ शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT