Monsoon Spice Storage Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Spice Storage Tips: पावसाळ्यात मसाले खराब होतात? वापरा या ५ सोप्या ट्रिक्स, मसाले राहतील एकदम ताजे

Monsoon Spice Storage Tips: . तुमचेही मसाले खराब झालेत? तर टेन्शन घेऊ नका. खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मसाले पावसाळ्याही टिकवून ठेवू शकता.

Manasvi Choudhary

Kitchen Tips:

गेले काही दिवस महाराष्ट्रात खूप पाऊस पडत आहे. वातावरणात ओलावा आणि दमटपणा पसरला आहे. त्यामुळे कपडे कसे सुकणार? हा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडला आहे . शिवाय स्वयंपाकघरातील मसाले देखील या ओलसरपणामुळे खराब होऊ लागले आहेत. तुमचेही मसाले खराब झालेत? तर टेन्शन घेऊ नका. खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मसाले पावसाळ्याही टिकवून ठेवू शकता.

मसाले खराब झालेत हे कसं ओळखाल?

मसाले हे पदार्थांची चव वाढवतात. एखाद्या पदार्थाला मसाल्यांमुळे चविष्टपणा येतो. पण जर जास्त आर्द्रतेच्या संपर्कात मसाले येत असतील. तर मसाले लवकर खराब होतात. त्यामुळे खास करून पावसाळ्यात मसाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. मसाले खराब झाले असल्यास मसाल्याचा सुगंध नाहिसा होतो आणि चवही लागत नाही. त्याचा रंग बदलू शकतो. किंवा विचित्र वास देखील येऊ शकतो. शिवाय मसाल्यांना किड आणि बुरशी लागते.

मसाले स्वच्छ राहण्यासाठी या टिप्स करा फॉलो

मसाल्यांना दमटपणापासून वाचवण्यासाठी नेहमी हवाबंद डब्यांचा वापर करा. मसाले वापरासाठी काढताना नेहमी कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरा. स्वयंपाकघरातील खिडकी, गॅस स्टोव्ह, सिंक यासोबत मसाल्यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. मध्येच केव्हातरी मसाल्यांना कडक उन्हात सुकत घाला. मसाले नेहमी कोरड्या काचेच्या बरणीत साठवा. आवश्यक असल्यास फूड ग्रेडचे सिलिका जेल किंवा ओलावा शोषून घेणारे पॅक देखील वापरू शकता. परंतु त्याच्या अतिवापराने देखील मसाले खराब होऊ शकतात.

कोणत्या चूका टाळ्याव्यात?

1) मसाले फ्रिज मध्ये ठेवणे टाळा. कारण बाहेर काढल्यावर तापमानात बदल होतो आणि मसाले खराब होऊ शकतात.

2) प्लॅस्टिकच्या बरण्यांनमध्ये टाळा. काचेच्या बरणीत मसाले उत्तम राहतात. ओला चमचा किंवा ओले हात सतत मसाल्यांना लावू नये.

3) खराब झालेले मसाले केवळ अन्नाची चवच बिघडवत नाही तर त्याचा दुष्परिणाम आरोग्यावरही होतो.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT